Join us  

PHOTOS : सोडूच नका ताई सात जन्म..., प्रसाद ओकच्या बायकोला चाहत्याचा खास सल्ला..!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 3:28 PM

1 / 9
मराठी नाटक, सिनेमा आणि मालिकांमधील दमदार अभिनयानं प्रेक्षकांवर आपली जबरदस्त छाप पाडणारा अभिनेता प्रसाद ओक आणि त्याची बायको मंजिरी ओक यांच्याबद्दल खरं तर नव्यानं सांगण्याची गरज नाही. मराठी चित्रपटसृष्टीतील हे लोकप्रिय कपल.
2 / 9
सध्या चर्चा आहे ती प्रसाद आणि मंजिरी यांच्या फोटोंची आणि त्यावर चाहत्यांनी दिलेल्या कॅप्शनची. होय, आज वटपौर्णिमा. त्यानिमित्त मंजिरी व प्रसादने दोन सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3 / 9
आज वटपौर्णिमा म्हणून, बाकी काहीच कारण..., असं मजेशीर कॅप्शन देत दोघांनीही सेम फोटो शेअर केलेत आणि या सुंदर, गोड फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्स नुसता पाऊस पडला.
4 / 9
रब ने बना दी जोडी, असं एका चाहत्याने लिहिलं. एका चाहत्याने तर या फोटोंवर कमेंट करताना मंजिरी वहिनीला खास सल्लाही दिला. ‘सोडूच नका ताई सात जन्म’ असं या चाहत्याने लिहिलं.
5 / 9
मंजिरी ही प्रसादसोबत अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करते. शिवाय बिझनेस वुमन अशीही तिची ओळख आहे.
6 / 9
सोशल मिडीयावर विविध ब्रँडसोबत कोलॅबोरेशन करून ती छोट्या उद्योजकांना मदत करते. अलीकडे मंजिरीचं नाव एक नथीला देण्यात आलं होतं.
7 / 9
7 जानेवारी 1998 रोजी प्रसाद आणि मंजिरी लग्नबंधनात अडकले होते. प्रसादचा भाऊ हा मंजिरीचा मित्र होता. हाच मंजिरी व प्रसादला एकत्र आणणारा दुवा ठरला.
8 / 9
मंजिरीला सुद्धा अभिनयाची आवड असल्याने भावाच्या माध्यमातून ती प्रसादच्या अभिनयाच्या कार्यशाळेमध्ये सहभागी झाली होती.
9 / 9
साधारण तीन महिने ही कार्यशाळा होती. त्याच काळात हे दोघे एकमेकांच्या जवळ आहे. कुणीही कुणाला प्रपोज केलं नाही. पण दोघंही एकमेकांत गुंतले होते. यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेत आयुष्याची नवीन सुरुवात केली होती.
टॅग्स :प्रसाद ओक