Join us  

मृणाल कुलकर्णी यांनी शेअर केला पतीसोबतचा फोटो, फॅन्सनी दिल्या भरभरून कमेंट्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 5:31 PM

1 / 7
कसदार अभिनय आणि आपल्या सौंदर्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेल्या अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी. आजच्या तरुणींनाही लाजवेल असं त्यांचं सौंदर्य असून मराठी आणि हिंदीत त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवलाय.
2 / 7
मृणाल कुलकर्णी यांच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर आपल्याला त्यांच्या पतीचे अनेक फोटो पाहायला मिळतात.
3 / 7
१० जून १९९० रोजी वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी मृणाल कुलकर्णी यांचे लग्न झाले. मृणाल यांचे पती रुचिर कुलकर्णी हे व्यवसायाने वकील आहेत.
4 / 7
बारावीत शिकत असताना मृणाल यांनी 'स्वामी' या मालिकेत पहिल्यांदा काम केले होते.
5 / 7
सुरुवातीला अभिनयात करिअर करावे असे त्यांच्या डोक्यातही नव्हते. मात्र लग्न झाल्यानंतर खर्‍या अर्थाने अभिनय क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहायला लागले, असे मृणाल यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.
6 / 7
मृणाल कुलकर्णी यांनी हा फोटो काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता. हा फोटो मृणाल यांच्या लग्नातील आहे. या फोटोत मृणाल यांना ओळखताही येत नाही.
7 / 7
मृणाल कुलकर्णी यांच्या मुलाचे नाव विराजस असून माझा होशील ना या मालिकेत तो सध्या मुख्य भूमिका साकारत आहे.
टॅग्स :मृणाल कुलकर्णी