Join us  

आर्चीनंतर परश्यानेही केली केदारनाथ यात्रा, आकाश ठोसरचे Photos पाहिले का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 12:32 PM

1 / 7
मराठीतील ऑल टाईम हिट जोडी म्हणजेच सैराट फेम आर्ची परश्या. त्यांचा एक वेगळाच चाहतावर्ग आहे. दोघांचंही गावाशी खास नातं आहे त्यामुळे त्यांची भाषा, साधेपणा यामुळे ते लगेच प्रेक्षकांच्या मनात उतरतात.
2 / 7
सैराट नंतर त्या दोघांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. दोघांनीही काही महिन्यांपूर्वी आलेल्या 'झुंड' या हिंदी सिनेमात भूमिका साकारली. मात्र लीड रोलमध्ये या जोडीला पुन्हा पडद्यावर पाहण्याची चाहत्यांची इच्छा अद्याप पूर्ण झालेली नाही.
3 / 7
काही दिवसांपूर्वी रिंकूने (Rinku Rajguru) केदारनाथ यात्रा केली. तिच्या या अविस्मरणीय यात्रेचे फोटो व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. तिच्यासाठी ही यात्रा खूपच खास ठरली.
4 / 7
आता रिंकूनंतर काही दिवसांपूर्वीच आकाश ठोसरही (Akash Thosar) केदारनाथ यात्रेला जाऊन आला. आकाशचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झालेत. केदारनाथ मंदिरासमोर त्याने केलेलं फोटोशूट चर्चेत आहे.
5 / 7
पांढरा टीशर्ट, पँट, शूज,कानटोपी आणि हँडग्लोव्हज असा आकाशचा लूक होता. तर मागे केदारनाथचं अद्भूत मंदिर दिसत होतं.
6 / 7
यानंतर आकाशने निसर्गरम्य वातावरणात वर्कआऊट करतानाचाही व्हिडिओ शेअर केला. एकूणच त्याचा प्रवास किती सुरेख झाला याची झलक त्याच्या सोशल मीडियावरुन दिसते.
7 / 7
रिंकू आणि आकाश दोघंही आपापल्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहेत. रिंकू लवकरच 'झिम्मा 2' आणि ललित प्रभाकरसोबतच्या एका सिनेमात दिसणार आहे. तर आकाश ठोसर आगामी सिनेमात बाल शिवाजीची भूमिका साकारणार आहे.
टॅग्स :आकाश ठोसररिंकू राजगुरूमराठी अभिनेताकेदारनाथ