Join us  

थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय..!, 'दे धक्का २'मध्ये सायलीच्या भूमिकेत दिसणार महेश मांजरेकरांची लेक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 3:11 PM

1 / 9
२००८ साली दे धक्का (De Dhakka) चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत धमाल उडवली होती. मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, सिद्धार्थ जाधव, मेधा मांजरेकर अशा कलाकारांचा समावेश असलेल्या या विनोदी चित्रपटाने सर्वांची मने जिंकली होती. आता या चित्रपटाचा सीक्वल ५ ऑगस्टला भेटीला येतो आहे.
2 / 9
'दे धक्का' चित्रपटात सायलीची भूमिका बालकलाकार गौरी वैद्यने साकारली होती. मात्र आता सीक्वलमध्ये या भूमिकेसाठी दुसऱ्या अभिनेत्रीची वर्णी लागली आहे.
3 / 9
सायलीच्या भूमिकेत गौरी वैद्य ऐवजी महेश मांजरेकरांची तिसरी लेक गौरी इंगवले दिसणार आहे.
4 / 9
गौरी इंगवले ही मेधा मांजरेकर यांच्या पहिल्या नवऱ्याची लेक आहे. त्यामुळे आपल्या मुलांप्रमाणेच महेश मांजरेकर गौरीला देखील आपल्या मुलांप्रमाणेच सांभाळत आहेत.
5 / 9
गौरी हिने बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली आहे.
6 / 9
अभिनेता जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या 'कुटुंब' या चित्रपटात गौरीने बालकलाकार म्हणून काम केले होते.
7 / 9
तसेच ओवी नाटकात गौरीने मध्यवर्ती भूमिका केली होती. शेवटची ती पांघरूण चित्रपटात झळकली. या चित्रपटातील तिच्या कामाची सर्वत्र खूप प्रशंसा झाली होती.
8 / 9
दे धक्का २ चित्रपटाचा नुकताच प्रदर्शित झालेला टीझर पाहून हा चित्रपट प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करणारा ठरेल, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
9 / 9
‘दे धक्का २’ चित्रपटात सर्वाचा मॉर्डन अवतार पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्या बॅनर खाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
टॅग्स :महेश मांजरेकर मेधा मांजरेकरसिद्धार्थ जाधवदे धक्का 2