Join us  

या रेट्रो लूकमध्ये ही अभिनेत्री दिसतेय इतकी वेगळी की ओळखणे देखील होतंय कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 7:47 PM

1 / 10
जुई गडकरी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिने तिचे रेट्रो लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
2 / 10
जुईचे हे फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असल्याचे ते तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.
3 / 10
जुई गडकरी 'पुढचं पाऊल' मालिकेतील सोज्वळ सूनेच्या भूमिकेतून घराघरात पोहचली. या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली.
4 / 10
त्यानंतर ती 'सरस्वती' मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.
5 / 10
मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वात ती सहभागी झाली होती. या शोमधून तिने रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले. जवळपास ती दोन महिने बिग बॉसच्या घरात होती.
6 / 10
या शोमधून बाहेर पडल्यानंतर ती युरोप टूरवर मोठ्या कालावधीसाठी गेली होती.
7 / 10
जुई गडकरीने बिग बॉसनंतर वर्तुळ या मालिकेत काम केले होते.
8 / 10
जुई सोशल मीडियाद्वारे समाजातील प्रश्नांवर आपले मत व्यक्त करत असते.
9 / 10
जुईला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग आहे.
10 / 10
जुईच्या अभिनयाप्रमाणे तिच्या सौंदर्याची नेहमीच चर्चा रंगते.
टॅग्स :जुई गडकरी