Join us  

अभिनेता भूषण प्रधान या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, 'त्या' फोटोंमुळे चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 12:56 PM

1 / 9
मराठी सिनेइंडस्ट्रीतील हॅण्डसम हंक भूषण प्रधान नुकताच महेश मांजरेकर दिग्दर्शित जुनं फर्निचरमध्ये पाहायला मिळाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या चित्रपटातील भूषणच्या कामाचं सर्वत्र खूप कौतुक झाले.
2 / 9
भूषण प्रधानच्या अभिनयासोबतच त्याच्या पर्सनॅलिटीवर अनेकजण फिदा आहेत. अनेक तरूणींचा तो क्रश आहे. भूषण त्याच्या फिटनेससाठीही ओळखला जातो.
3 / 9
भूषण प्रधान कमालीचा फिटनेस आणि लूकमुळे नेहमीच चर्चेत असतो. परंतु, सध्या भूषण त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. भूषण एका अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या सध्या चर्चा रंगल्या आहेत.
4 / 9
भूषणचा सोशल मीडियावर चांगलाच फॅन फॉलोव्हिंग आहे. त्यामुळे तो सोशल मीडियावरून चाहत्यांना अपडेट देत असतो. नुकतंच त्याच्या एका पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
5 / 9
भूषणने अभिनेत्री अनुषा दांडेकरबरोबरच्या फोटोंचा कोलाज असलेला व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्याच्या या पोस्टमुळे भूषण आणि अनुषाच्या डेटिंगच्या चर्चांना उधाण आलं आहे.
6 / 9
या व्हिडीओत भूषण आणि अनुषा रोमँटिक अंदाजात दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये थर्ड एडिशन असे लिहिले आहे.
7 / 9
त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. भूषणचे अनुषासोबतचे फोटो पाहून ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत की काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. एकाने कमेंट करत 'लवकरच लग्न करणार तुम्ही दोघं' असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने 'तुम्ही दोघं एकत्र छान दिसता' अशी कमेंट केली आहे.
8 / 9
अनेक सुपरहिट चित्रपटात काम केलेल्या भूषण प्रधानचे नाव अनेक अभिनेत्रींबरोबर जोडलं गेलं आहे. आता अनुषाबरोबर त्याच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या आहेत. खरेतर त्या दोघांनी जुनं फर्निचर सिनेमात पती पत्नीची भूमिका केली आहे.
9 / 9
अनुषा ही बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरची मेहुणी आहे. करण कुंद्राबरोबरच्या रिलेशनशिपमुळे ती चर्चेत होती. ५ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अनुषा आणि करणमध्ये काही कारणांमुळे ब्रेकअप झालं होतं.
टॅग्स :भुषण प्रधानअनुषा दांडेकर