Join us

गायत्रीची झाली मधली सुट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2016 15:50 IST

अनेक चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारी अभिनेत्री गायत्री सोहमने नुकतेच एक हॉटेल सुरु केले आहे. होय, गायत्री ...

अनेक चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारी अभिनेत्री गायत्री सोहमने नुकतेच एक हॉटेल सुरु केले आहे. होय, गायत्री आता एका झक्कास हॉटेलची मालकीण देखील झाली आहे. 

मधली सुट्टी नावाचे एक छान रेस्टॉरंट नुकतेच गायत्रीने नाशिकमध्ये सुरु केले आहे. नावातच वेगळेपण असलेल्या गायत्रीच्या या रेस्टॉरंटला अनेक फुड लव्हर्सनी पसंती दाखविली आहे.

 अनेक चविष्ठ पदार्थांची मेजवानी मधली सुट्टीमध्ये खवय्याना मिळणार आहे. गायत्रीचे हे हॉटेल प्युअर व्हेज आहे. मधली सुट्टी झाली कि शाळेतील मुलांना जो आनंद होतो. तसाच आनंद गायत्रीच्या मधली सुट्टीमध्ये जेवल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे. आता गायत्रीच्या चाहत्यांना मात्र या हॉटेलला एकदा तरी भेट दिल्याशिवाय चैन पडणार नाही एवढे मात्र खरे.