Join us

​मार्च महिन्यात प्रदर्शित होणार चार मराठी चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 03:47 IST

मराठी चित्रपटसृष्टीने आपल्या चाहत्यांसाठी आगळी वेगळी मेजवानी आणली असून मार्च महिन्यात चार नविन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. मराठी लोकांना ...

मराठी चित्रपटसृष्टीने आपल्या चाहत्यांसाठी आगळी वेगळी मेजवानी आणली असून मार्च महिन्यात चार नविन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. मराठी लोकांना हे चित्रपट अधिक पसंत पडणार आहेत. यात चित्रपट निर्मात्यांनी वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केला आहे.१) सरपंच भगिरथ- शिवकुमार लाड निर्देशित हा चित्रपट ४ मार्च रोजी प्रदर्शित होणार असून रामदास फुटाणे यांचे दिग्दर्शन लाभले आहे. यात उमेंद्र लिमये, विना जामकर, मोहन आगासे, किशोर कदम, सविता मलपेकर, स्वरांगी मराठे आदी कलाकार असणार आहेत.२) फुंटरु- निर्माता कृषिका लुल्ला आणि सुजय डहाळे यांनी दिग्दर्शित केलेला फुंटरु हा चित्रपट ११ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. केतकी माटेगावकर, मदन देवधर, शिवाणी रंगोळे, रुतूराज शिंदे, शिवराज वैचल, अंशुमन जोशी आणि रोहित निकम आदी कलाकार असणार आहेत.३) अनुराग- निमार्ती डॉ. अपर्णा दरक व डॉ. अंबरिष दरक यांच्या दिग्दर्शनातील ‘अनुराग’ हा चित्रपट ११ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. यात मृण्मयी देशपांडे व धर्मेंद्र गोहिल यांची प्रमुख भूमिका असणार आहे.४) वेल डन भाल्या- निर्माती चैताली के व अमोल काळे तसेच नितीन कांबळे यांच्या दिग्दर्शनातील ‘वेल डन भाल्या’ हा चित्रपट १८ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. यात नंदकुमार सोलकर, रमेश देव, संजय नार्वेकर, अलका कुबल, गणेश जाधव तसेच मिनल जगताप आदी कलाकार असणार आहेत.