Join us  

"हे तू काय केलंस", 'हंटर' सिनेमा पाहिल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया ऐकून दु:खी झालेली सई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 2:11 PM

1 / 12
बोल्ड अँड ब्युटिफूल सई ताम्हणकर तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून सईने नाव कमावलं.
2 / 12
केवळ मराठीच नाही तर बॉलिवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीही सईने गाजवली आहे. २०१५ साली प्रदर्शित झालेल्या 'हंटर' या बॉलिवूड सिनेमामुळे सई चर्चेत आली होती.
3 / 12
राधिका आपटे, गुलशन, सागर देशमुख अशी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन हर्ष कुलकर्णी यांनी केलं होतं. या सिनेमात सईने ज्योत्स्ना ही भूमिका साकारली होती.
4 / 12
'हंटर'मधील तिच्या बोल्ड सीन्सचीही प्रचंड चर्चा रंगली होती. 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत सईने या सिनेमाचा अनुभव सांगितला.
5 / 12
सई म्हणाली, 'मी गुलशन आणि राधिकाची जबरदस्त फॅन आहे. त्यांच्याबरोबर काम करायचं म्हणून मी खूप उत्सुक होते. हर्ष कुलकर्णीला जेव्हा मी भेटले तेव्हा मला एक माणूस आणि दिग्दर्शक म्हणून ती व्यक्ती खूप आवडली.'
6 / 12
'त्या भूमिकेसाठी ज्या अभिनेत्रीची निवड झाली होती. तिच्या कुटुंबात ऐनवेळी काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. त्यामुळे ती काम करू शकत नव्हती.'
7 / 12
'हर्षने मला पहिल्यांदा बघितलं तेव्हा तो म्हणाला तू खूप छोटी दिसतेस. तेव्हा मग मी त्यांना माझे साडीतले फोटो दाखवले.'
8 / 12
'तू साडीत वेगळी वाटते. आपण करुया हा सिनेमा, असं तो मला म्हणाला.
9 / 12
''हंटर' जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा काही लोकांच्या 'हे तू काय केलंस' अशा प्रतिक्रिया होत्या. हे मला अपेक्षित नव्हतं. तू किती धाडसी आहेस, असं लोक म्हणतील असं मला वाटलं होतं.'
10 / 12
'तू या सेटअपमध्ये पण तुझी छाप पाडून गेलीस, अशा प्रतिक्रिया असतील असं वाटलं होतं. पण, अशी एकही व्यक्ती मला भेटली नाही. या गोष्टीचं मला खूप वाईट वाटलं.'
11 / 12
'आम्हाला तुझा गर्व वाटेल, असं काहीतरी कर, असं काही जण म्हणाले होते. जे लोक असं बोलले होते, ते अलीकडे २-४ वर्षांपूर्वी मला म्हणाले की आम्हाला तुझा गर्व आहे.'
12 / 12
'त्याच्यामुळे मला असं वाटतं की काही प्रोजेक्ट हे वेळेच्या पुढचे असतात. 'हंटर'देखील असाच सिनेमा होता.'
टॅग्स :सई ताम्हणकरसेलिब्रिटी