Join us  

मराठमोळ्या अभिनेत्रीचा कहर! ब्लाउजविना नेसली साडी, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 2:13 PM

1 / 9
रात्रीस खेळ चाले (Ratris Khel Chaale) या मालिकेच्या तिसऱ्या भागात अभिनेत्री कृतिका तुळसकर (Krutika Tulaskar) हिने शेवंताची भूमिका साकारली होती.
2 / 9
कृतिका सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. बऱ्याचदा ती बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येत असते.
3 / 9
दरम्यान कृतिकाने सोशल मीडियावर बोल्ड फोटोशूट शेअर केले आहे. यात तिने ब्लाउजविना साडी नेसली आहे.
4 / 9
कृतिकाच्या या फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
5 / 9
यापूर्वीही कृतिका तुळसकरने बोल्ड फोटोशूट केले होते आणि ती चर्चेत आली होती.
6 / 9
रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेत शेवंताची भूमिका कृतिका तुळसकरने साकारली होती. या मालिकेतून ती घराघरात पोहचली.
7 / 9
कृतिका गेल्या १८ वर्षांपासून रंगभूमीवर कार्यरत आहे. तसेच ती अनेक नाटक आणि चित्रपटात झळकली आहे.
8 / 9
ती कथ्थक विशारदही आहे. विशेष बाब म्हणजे ती मानसोपचारतज्ञ म्हणूनही कार्यरत आहे.
9 / 9
शेवटची ती बॉईज ४मध्ये झळकली होती. यात तिने प्रोफेसरची भूमिका साकारली होती.