Join us  

झक्कास! एक नंबर!! भार्गवी चिरमुलेचा नवा लुक पाहिलात का? पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2022 4:55 PM

1 / 9
भार्गवी चिरमुले हिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. अनेक मराठी हिंदी मालिका व चित्रपटांमध्ये आपण तिचा अभिनय पाहिला आहेच. सध्या मात्र चर्चा भार्गवीच्या नव्या लुकची आहे.
2 / 9
होय, भार्गवीने नव्या लुकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात ती एकदम वेगळी दिसतेय.
3 / 9
भार्गवीनं नवीन हेअरकट केला आहे. लांब केस कापून तिने केस शॉर्ट केलेत. पण या हेअरकटमध्येही ती कमालीची सुंदर दिसतेय.
4 / 9
अनेक सेलिब्रिटींनी तिच्या या नव्या लुकवर कमेंट्स केल्या आहेत. मंजिरी ओक, क्रांती रेडकर, सुकन्या मोने,मनवा नाईक, ऋतुजा बागवे, मानसी नाईक, शिवानी बावकर आदींनी तिचा लुक आवडल्याचं म्हटलं आहे.
5 / 9
व्वा, एक नंबर, भारी दिसतेय अशा कमेंट्स चाहत्यांनी दिल्या आहेत. काहींनी तिची मजाही घेतली आहे. छोटी बच्ची हो क्या, अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.
6 / 9
भार्गवी सोशल मीडियावरही सक्रीय असते. वेगवेगळ्या अंदाजातील फोटो ती चाहत्यांसाठी शेअर करत असते. तिचे फोटो क्षणात व्हायरल होतात.
7 / 9
भार्गवी फिटनेस प्रेमी आहे. डान्स आणि वर्कआऊट या तिच्या आवडत्या गोष्टी आहे. वर्कआऊटचे अनेक व्हिडीओही ती शेअर करत असते.
8 / 9
भार्गवी सध्या ती कलर्स मराठीवरील ‘आई मायेचं कवच’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत तिने आईची भूमिका साकारली आहे.
9 / 9
भार्गवीने आतापर्यंत वहिनीसाहेब, चार दिवस सासूचे, अनुबंध, असंभव, जागो मोहन प्यारे यांसारख्या मालिकांत काम केले आहे.
टॅग्स :भार्गवी चिरमुलेमराठी अभिनेता