Join us  

Jeh Ali Khan : दोन वर्षांचा झाला छोटा नवाब! आई, आत्या, मावशीने दिल्या खास शुभेच्छा; क्यूट जेहचे Photo व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 3:11 PM

1 / 10
अभिनेत्री करिना कपूर खानची दोन्ही मुलं नेहमीच त्यांच्या क्यूटनेसमुळे लक्ष वेधून घेत असतात. त्यात तैमुरला तर जन्मत:च किती लोकप्रियता मिळाली हे वेगळं सांगण्याची गरज नाही.
2 / 10
तैमुरचा लहान भाऊ छोटा नवाब जेह अली खान सुद्धा आता तितकाच लोकप्रिय आहे. तैमुरप्रमाणेच जेहनेही क्यूटनेसमुळे लक्ष वेधून घेतले आहे.
3 / 10
आज कपूर आणि खान कुटुंब जेह अली खानचा वाढदिवस साजरा करत आहे. जेह आज दोन वर्षांचा झाला आहे. २१ फेब्रुवारी २०२१ मध्ये जेहचा जन्म झाला.
4 / 10
लाडक्या लेकासाठी करिना कपूरने खास अंदाजात त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. जेह नेहमीच आईच्या कडेवर, तिच्या आसपास खेळताना दिसतो.करिनाने असेच खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
5 / 10
जेह करिनाच्या मांडीवर बसला असून उठण्याचे नावच घेत नाहीए. लंडन मधील एका शूटदरम्यानचे हे फोटो आहेत. जेह ला माझ्या मांडीवरुन उठायचेच नाही, पण लवकरच उलट परिस्थिती असेल.हॅपी बर्थडे जेह बाबा. असं कॅप्शन करिनाने दिलं आहे.
6 / 10
तर जेहची आत्या म्हणजेच सैफ अली खानची बहिण सोहा अली खाननेही जेहसोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. यामध्ये छोट्या नवाबचा खट्याळ मूड दिसून येतोय.
7 / 10
आपण अशाच प्रकारे नेहमी हसत खेळत राहू असं एक गोड कॅप्शन लिहित तिने भाच्याला शुभेच्छा दिल्या आहेत
8 / 10
याशिवाय जेहची मावशी करिष्मा कपूरने भाच्यासोबतचा एक गोड फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो तर चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस पडला आहे.
9 / 10
छोटा नवाब पापाराझींचा देखील लाडका आहे. तो जिथे जातो तिथे पापाराझी त्याचे फोटो, व्हिडिओ क्लिक करण्यासाठी गर्दी करतात. तेव्हा जेहचा क्यूट चेहराही बघण्यासारखा असतो.
10 / 10
जेहच्या या क्यूटनेसमुळे त्याचे आतापासूनच बरेच चाहते झालेत.कधी आई करिना सोबत तर कधी भाऊ तैमुर सोबत तो मस्ती करताना दिसतो.
टॅग्स :करिना कपूरतैमुरसैफ अली खान