Join us

डिझायनर संजय गर्ग यांच्या फॅशन स्टोअरचे लाँचिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:23 IST

डिझायनर संजय गर्ग यांच्या फॅशन स्टोअरचे मुंबईत अलीकडेच लाँचिंग करण्यात आले. तेव्हा बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी या लाँचिंगच्या सोहळ्याला हजेरी लावली. हे स्टार्स देखील त्यांच्या हटके लुकमध्ये येथे आले होते.

डिझायनर संजय गर्ग यांच्या फॅशन स्टोअरचे मुंबईत अलीकडेच लाँचिंग करण्यात आले. तेव्हा बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी या लाँचिंगच्या सोहळ्याला हजेरी लावली. हे स्टार्स देखील त्यांच्या हटके लुकमध्ये येथे आले होते.डिझायनर संजय गर्ग यांच्या फॅशन स्टोअरचे लाँचिंग करण्यात आले. त्यावेळी त्यांनी सर्व कलाकारांना स्टोअरच्या कलेक्शनविषयी माहिती दिली.फॅशन स्टोअरच्या लाँचिंगवेळी किरण रावने फोटोग्राफर्सना अशी पोझ दिली.सोनम कपूर ही नेहमीच तिच्या हटके फॅशन स्टाईलने सर्वांना इम्प्रेस करत असते. या लाँचिंग कार्यक्रमावेळी ती अतिशय सुंदर अशी ज्वेलरी घालून आली होती. तिच्याकडे पाहिल्यावर जाणवते की तिला ‘मस्सकली गर्ल’ का म्हणतात ते!ब्लॅक ब्युटी अभिनेत्री कोंकणा सेन ही काळ्या रंगाच्या साडीत अत्यंत क्यूट दिसत होती. ब्लॅक अ‍ॅण्ड रेड अशा प्रकारातील ही साडी तिचे सौंदर्य अधिक खुलवत होते.‘आॅल टाईम’ क्यूट अभिनेत्री सोहा अली खान पिवळ्या रंगाच्या ड्रेसिंगमध्ये अशी क्यूट दिसत होती.विविध कार्यक्रमांमध्ये सुत्रसंचालन करणारी मिनी माथूर ही या लाँचिंगवेळी उपस्थित झाली होती. तिचा हा अत्यंत साधा लुक सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.रूही जयकिशन या अत्यंत पारंपारिक वेशात या लाँचिंगला आल्या होत्या. परंपरेला जोडून त्यांनी स्वत:ची ड्रेसिंग केली होती.