Join us  

PICS : ‘KGF2’च्या रिलीजआधी सुपरस्टार यशचं बालाजींना साकडं, घेतलं तिरूपतीचं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 12:54 PM

1 / 7
कन्नड सुपरस्टार यशचा ‘केजीएफ 2’ हा सिनेमा उद्या 14 एप्रिलला चित्रपटगृहांत धडकणार आहे.
2 / 7
‘केजीएफ 2’ रिलीज होणार म्हटल्यावर यशच्या चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलीये. चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी यश बालाजींच्या चरणी नतमस्तक झाला.
3 / 7
यशने नुकतंच तिरूपती बालाजींचं दर्शन घेत, बालाजींकडे साकडं घातलं. चित्रपटाला यश मिळू देत अशी प्रार्थना त्याने केली.
4 / 7
तिरूपती देवस्थानाला भेट देतानाचे यशचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
5 / 7
सिम्माचलम या सुप्रसिद्ध मंदिरालासुद्धा भेट दिली आहे. अभिनेत्याचा हा अंदाज चाहत्यांना फारच पसंत पडत आहे. चाहते त्याचं भरभरून कौतुक करत आहेत.
6 / 7
2018 मध्ये ‘केजीएफ 1’ रिलीज झाला होता. या चित्रपटात अभिनेता यश अर्थातच नवीन कुमार गौडाने मुख्य भूमिका साकारली होती.
7 / 7
‘केजीएफ 1’ चित्रपटाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आणि यश देशभर लोकप्रिय झाला. चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला.
टॅग्स :केजीएफयशतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाट