Join us  

KGF 2 Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर 'रॉकी भाई'चाच बोलबाला, सातव्या आठवड्यातही घौडदौड कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 2:26 PM

1 / 8
प्रशांत नील दिग्दर्शित केजीएफ २ हा २०२२ चा सुपरहिट चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाच्या कलेक्शनच्या बाबतीत सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. रिलीजच्या ४३व्या दिवसानंतरही या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर कमाई सुरूच आहे.
2 / 8
रॉकी भाई म्हणजेच यशचा डंका जगभरात वाजत आहे. विशेश बाब म्हणजे हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर प्रदर्शित झाला आहे, परंतु तरीही लोकांना चित्रपटगृहांमध्ये पाहायला आवडत आहे. आता या चित्रपटाच्या कलेक्शनबाबत नवी माहिती समोर आली आहे.
3 / 8
'KGF Chapter 2' ने पाच आठवड्यात 1210.53 कोटी रुपयांचे कलेक्शन केले. आता हा चित्रपट सातव्या आठवड्यात दाखल झाला असला तरी बॉक्स ऑफिसवर त्याची कमाई सुरूच आहे.
4 / 8
'KGF 2' ने सातव्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी 1.02 कोटी, दुसऱ्या दिवशी 1.34 कोटी, तिसऱ्या दिवशी 2.41 कोटी, चौथ्या दिवशी 3.06 कोटी कमावले आहेत. अशा प्रकारे या चित्रपटाने आतापर्यंत 1238.20 कोटींची कमाई केली आहे.
5 / 8
विशेष म्हणजे प्रशांत नीलने 'KGF Chapter 2' चे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची कथाही त्यांनीच लिहिली आहे. यापूर्वी त्याने 'केजीएफ चॅप्टर 1' दिग्दर्शित केला होता, जो बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.
6 / 8
यश व्यतिरिक्त संजय दत्त, रवीना टंडन, प्रकाश राज आणि श्रीनिधी शेट्टी या स्टार्सनी 'KGF 2' मध्ये काम केले आहे.
7 / 8
सध्या प्रशांत नील प्रभाससोबत 'सालार'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
8 / 8
'सालार'चे शूटिंग पूर्ण केल्यानंतर तो 'केजीएफ चॅप्टर 3'च्या शूटिंगला सुरुवात करणार असल्याची चर्चा आहे.
टॅग्स :केजीएफयश