Join us

एकेकाळी ह्रतिकसारखा दिसणा-या "त्या" अभिनेत्याला ओळखणंही कठीण

By admin | Updated: June 13, 2017 12:00 IST

लूक जरी सारखा असला तरी ह्रतिकप्रमाणे हरमन बावेजाचं करिअर यशस्वी होऊ शकलं नाही

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - अभिनेता ह्रतिक रोशनसारखा दिसणारा अभिनेता म्हणून ज्याला ओळखलं जायचं तो अभिनेता म्हणजे हरमन बावेजा. मात्र आता तो अजिबात ह्रतिकसारखा दिसत नाही. हरमन बावेजा याने ‘लव्ह स्टोरी २०५०’ या सायन्स फिक्शनमधून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. यावेळी त्याचा लूक ह्रतिकसारखा दिसत असल्याने खूप चर्चा झाली होती. मात्र लूक जरी सारखा असला तरी ह्रतिकप्रमाणे त्याचं करिअर यशस्वी होऊ शकलं नाही. 
 
हरमन बावेजाला नुकतंच वांद्रेमधील एका रेस्टॉरंटच्या बाहेर पाहण्यात आलं. यावेळी त्याला ओळखणंही कठीण झालं होतं. एकेकाळी हॅण्डसम हंक म्हणून बॉलिवूडमध्ये एंट्री करणार हरमन इतका जाड झाला आहे की त्याची ओळखही पटत नाही आहे. हरमन त्याच्या वयाच्या (36) दुप्पट मोठा दिसत आहे. 
‘लव्ह स्टोरी २०५०’ चित्रपटात हरमन बावेजासोबत प्रियांका चोप्राची मुख्य भूमिका होती.. सायन्स फिक्शन असल्याने अनेक नव्या गोष्टी लव्ह स्टोरी २०५० मध्ये पहिल्यांदाच पाहता आल्या. मात्र बॉक्स ऑफिसवर हरमनचा पहिला चित्रपट सपशेल आपटला. यानंतर त्याने आशुतोष गोवारिकर यांच्या ‘व्हॉटस युवर राशी’ या चित्रपटात भूमिका केली, मात्र या चित्रपटालाही यश मिळाले नाही. 
‘लव्ह स्टोरी २०५०’ चित्रपटाच्या सेटवर हरमन आणि प्रियांकाचं अफेअर सुरु झालं होतं. जवळपास पाच वर्ष दोघांचं अफेअर सुरु होतं. फेब्रुवारी 2014 मध्ये हरमनने आपण बिपाशा बासूसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं कबुल केलं होतं. मात्र त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात त्यांचा ब्रेकअप झाला होता. 
लव्ह स्टोरी २०५०, व्हॉटस युवर राशी आणि ढिश्कियाऊ हे तिनही चित्रपट फ्लॉप झाल्याने हरमनचं करिअर झेप घेऊ शकलं नाही. हरमनने पंजाबी अॅनिमेशन चित्रपट "चार साहिबजादे"ला व्हॉईस ओव्हरदेखील दिला होता.