Join us  

Birthday Special: बॉलिवूडच्या या दिग्गज अभिनेत्याने तुरुंगात राहून हलचल सिनेमाची शूटिंग केली होती पूर्ण, जेलमधून आणले जायचे सेटवर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2021 11:24 AM

1 / 11
बलराज साहनी यांच्या जीवनावर रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी यांचा प्रभाव होता.त्या विचारांच्या आधारावर त्यांनी स्वत:ला घडवलं. सर्वंकष पद्धतीने संपूर्ण आयुष्यभर ते आपल्या विचारांशी एकनिष्ठ राहिले आणि त्याच आधारावर जगले.
2 / 11
‘हम लोग’, ‘दो बीघा जमीन’, ‘वक्त’ आणि ‘काबुलीवाला’ सारखे हिट सिनेमा देत बलराज साहनी यांनी रसिकांच्या हृदयात आपली एक वेगळेच स्थान निर्माण केले होते.
3 / 11
विशेष म्हणजे सिनेमातली भूमिका परफेक्ट व्हावी यासाठी ते कठोर मेहनत घ्यायचे. बारकाईने त्या भूमिकेचा आभ्यास करायचे. बलराज साहनी यांचा एक किस्सा आजही सा-यांच्या लक्षात आहे.
4 / 11
1951 मध्ये आलेल्या ‘हलचल’ सिनेमात बलराज साहनी यांना जेलरची भूमिका देण्यात आली होती. ही भूमिका साकारण्यासाठी बलराजदेखील तितकेच उत्साहित होते.
5 / 11
या भूमिकेसाठी काही दिवस जेलरसोबतही राहण्याचे त्यांनी ठरवली. तितक्यात एका मिरवणूकीत हिंसा भडकवली गेली आणि त्यात बलराज साहणीदेखील होते. हिंसा भडकवल्याप्रकरणी बलराज साहणी यांना देखील जेलची हवा खावी लागली होती.
6 / 11
सिनेमाचे शूटिंगही सुरुच होते. त्यामुळे जेलमध्ये राहून शूटिंग करण्याची परवानगी त्यांना देण्यात आली होती. साहनी रोज सकाळी जेमलधून शूटिंगवर जात आणि संध्याकाळी परत येत. तीन महिने त्यांनी तुरुंगात राहून हलचल सिनेमाची शूटिंग पूर्ण केली होती.
7 / 11
बलराज साहनी 1951 मध्ये आलेल्या ‘हम लोग’ सिनेमातून प्रचंड लोकप्रियता मिळाली असली तरीही.1953 मध्ये आलेला ‘दो बीघा जमीन’ त्यांच्या कारकिर्दीत मैलाचा दगड ठरला.
8 / 11
करिअरमधील सर्वोत्कृष्ट सिनेमा ‘गरम हवा’ होता. त्याची डबिंग त्यांनी केली होती मात्र ते पाहण्यासाठी ते राहिले नाहीत. 13 एप्रिल 1973 मध्ये त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
9 / 11
सिनेमा व्यतिरिक्त बलराज यांना लिखाणाचीह तितकीच आवड होती. यांनी मेरा पाकिस्तानी सफराना, एक सफर एक दास्तां आणि गैर जज्बाती डायरी सारखी पुस्तके लिहिली आहेत.
10 / 11
11 / 11
टॅग्स :बलराज सहानी