Join us

साडी नेसल्यास हिंदुत्ववादी म्हणाल- रविना टंडन

By admin | Updated: June 11, 2017 15:26 IST

90च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री असलेल्या रविना टंडन हिने अनेक चित्रपट गाजवले

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 11 - 90च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री असलेल्या रविना टंडन हिने अनेक चित्रपट गाजवले. स्वतःची मते परखडपणे मांडल्यामुळे ब-याचदा ती चर्चेत असते. सोशल मीडियाचं प्रभावी माध्यम असलेल्या ट्विटरवर तिने केलेले ट्विट ब-याचदा वाद ओढवून घेत असतात. असंच एक ट्विट रविना टंडन हिने केलं असून, तिला संघिष्ट म्हणून हिणवणाऱ्या कथित पुरोगाम्यांवर तिने निशाणा साधला आहे. ती म्हणाली, मी जर साडी नेसली तर मला ‘संघी’, ‘भक्त’ आणि ‘हिंदुत्ववादी’ ठरवले जाईल का? असा प्रश्न उपस्थित करत तिने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. रविनानं तिच्या ट्विटर अकाऊंटवर गुलाबी आणि निळ्या रंगामधील साडीतले काही फोटो पोस्ट केले आहेत. मला साडी नेसायला आवडते.. मग मी कोणाचाही विचार का करू?, असंही ती म्हणाली आहे. मात्र चाहत्यांनी तिला तू साडीत सुंदर दिसतेस असंही सांगितलं आहे. त्यानंतर काही चाहत्यांनी तिला तू राजकारण करत असल्याचंही सुनावलं आहे. त्यावेळी तिनेही त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. अनेकांना वाटतं मी राजकारणात प्रवेश करण्याचा विचार करते आहे. मात्र मला राजकारणात अजिबात रुची नाही. मला टीएमसी, काँग्रेस आणि भाजपाकडून ऑफर होती. मात्र मी ती धुडकावली आहे, असंही तिने चाहत्याला प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्या साडीच्या ट्विटरवर अनेक जण टीका करत आहेत.

मात्र मला कोणालाही दुखवायचं नाही. साडी हा सुंदर भारतीय आविष्कार आहे. माझं ट्विट सांप्रदायिकतेसाठी नाही. जर माझ्या ट्विटमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असल्याची मी माफी मागते, असंही रविना म्हणाली आहे.