Join us

प्रत्येक तरुणांसाठी हे आहेत 10 हेल्दी फूड्स, जे बनवतील

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:21 IST

आपण सुंदर दिसावे आणि आपले तारुण्य टिकू न राहावे, असे प्रत्येक तरुणाला वाटते. मात्र कित्येक तरुण खूप प्रयत्न करुनही त्यांचे सौंदर्य टिकवू शकत नाहीत. पण जे तरुण सुंदर दिसतात ते त्यांच्या डायट प्लॅनकडे विशेष लक्ष देतात. आपल्या डायटमध्ये न्यूट्रिएंट्सचे प्रमाण भरपूर असलेले खाद्यपदार्थ समावेश करीत असतात. ज्यामुळे स्मार्टनेस वाढून शरीरही स्ट्रॉँग राहते, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. आज जाणून घेऊ या की, अजून कोणते १० असे अन्नपदार्थ आहेत की जे प्रत्येक तरुणासाठी उपयुक्त आहेत.

आपण सुंदर दिसावे आणि आपले तारुण्य टिकू न राहावे, असे प्रत्येक तरुणाला वाटते. मात्र कित्येक तरुण खूप प्रयत्न करुनही त्यांचे सौंदर्य टिकवू शकत नाहीत. पण जे तरुण सुंदर दिसतात ते त्यांच्या डायट प्लॅनकडे विशेष लक्ष देतात. आपल्या डायटमध्ये न्यूट्रिएंट्सचे प्रमाण भरपूर असलेले खाद्यपदार्थ समावेश करीत असतात. ज्यामुळे स्मार्टनेस वाढून शरीरही स्ट्रॉँग राहते, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. आज जाणून घेऊ या की, अजून कोणते १० असे अन्नपदार्थ आहेत की जे प्रत्येक तरुणासाठी उपयुक्त आहेत. १) सफरचंद : यात फायबरचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे वेळोवेळी भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहते.२) लिंबू पाणी : यात सायट्रिक अ‍ॅसिड असते ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन्य दूर होतात आणि चेहऱ्याची चमक वाढते.३) पालक : यात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असून याचे सेवन केल्यास ब्लड सर्कुलेशन उत्कृष्ट राहील आणि आत्मविश्वास वाढेल.४) डार्क चॉकलेट : यात असणाऱ्या फ्लेवोनॉइड्समुळे मूड चांगला राहतो शिवाय चेहऱ्यावर ग्लो येतो.५) टोमॅटो : यात लायकोपिन असते ज्यामुळे त्वचेची चकाकी वाढते आणि चेहरा सुंदर दिसतो.६) सोयाबीन : यात आयसोफ्लेवॉन्स असल्याने रंग गोरा होतो आणि केस गळती थांबते.७) फिश (मासे) :यात ओमेगा ३ आणि फॅटी अ‍ॅसिड असते, ज्यामुळे केस काळे आणि दाट होतात शिवाय मसल्सदेखील स्ट्रॉँग होतात.८) अक्रोड : यात बायोटिन असल्याने त्वचा आणि केसांची चकाकी वाढते.९) केळी : यात पोटॅशियम असून याच्या सेवनाने ताणतणाव कमी होतो शिवाय मूडदेखील चांगला राहतो.१०) अंडी : यात प्रोटीन भरपूर प्रमाणात असल्याने याचे सेवन केल्यास मसल्स आणि अ‍ॅब्स स्ट्रॉंग होतात.