Join us  

'सारेगमप' लिटिल चॅम्प्समधील या चिमुरडीला ओळखलंत का?, आता दिसते खूपच वेगळी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2023 7:04 PM

1 / 9
१४ वर्षांपूर्वी महाराष्ट्राला गायनातील पाच लिटिल चॅप्स भेटले होते. सारेगमप लिटील चॅम्प्समध्ये एक निरागस पण खणखणीत आवाजाची एक चिमुरडी होती जिने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले होते. ही चिमुरडी म्हणजे गायिका मुग्धा वैशंपायन.
2 / 9
मुग्धा आज तिचा २२वा वाढदिवस साजरा करत आहे. कमी कालावधीत मुग्धा वैशंपायनने प्रसिद्धी मिळवली.
3 / 9
सारेगमपनंतर मुग्धाने गाण्याचे परिपूर्ण शिक्षण घेतले. त्यासोबतच तिने शालेय शिक्षण देखील पूर्ण केले.
4 / 9
दहावी बारावीत चांगल्या गुणांनी ती पास झाली होती. सध्या ती कॉलेजच्या शेवटच्या वर्षात शिकते आहे.
5 / 9
मुग्धाने गायनाबरोबर नृत्याचे देखील धडे गिरविले आहेत. मुग्धाचा स्वत:चे युट्यूब चॅनेल देखील आहे.
6 / 9
सारेगमप कार्यक्रमात सहभागी झाली तेव्हा मुग्धाचे वय फार कमी होते. तिच मुग्धा आता सारेगमच्या नव्या पर्वाचे परीक्षण देखील करताना दिसली होती.
7 / 9
एका मुलाखतीत तिला लहानपणी मिळवलेले यश तू कसे सांभाळलेस असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देत मुग्धा म्हणाली होती की, सारेगमपच्या यशाने मला खूप काही दिले. आपल्याला मोठं केलं आहे. प्रसिद्धी मिळाली आहे हे तेव्हा मला काहीच कळतच नव्हतं.
8 / 9
सारेगमपचा पहिला भाग शूट होऊन तो १५ दिवसांनी प्रसारित झाला होता. तेव्हा माझे पहिले गाणे टेलिव्हिजनवर पाहून मी बाबांना विचारले होते की, आपण जिथे गेलो होतो ते गाणे इथे दिसण्यासाठी होते का? इतका निरागस प्रश्न मी विचारला होता.
9 / 9
मुग्धाने पुढे म्हटले की, माझ्या शाळेच्या प्रिन्सीपलला माझं खूप कौतुक होतं. पण माझ्यामुळे इतर मुलांना वाईट वाटू नये यासाठी ते मला सर्वांसारखीच वागणूक द्यायचे. बाबांनी देखील शाळेत तिला वेगळी वागणूक देऊ नका, असे सांगितलं होते.
टॅग्स :सा रे ग म प