Join us  

‘चमको’ने चमकले नशीब! पाहा, दीप्ती नवल यांचे कधीही पाहिले नसतील असे फोटो...!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2021 8:00 AM

1 / 10
चश्मे बद्दूर आणि श्रीमान श्रीमती यासारख्या गाजलेल्या चित्रपटात काम करणा-या ज्येष्ठ अभिनेत्री दीप्ती नवल यांचा आज वाढदिवस.
2 / 10
आपल्या तीन दशकांच्या प्रदीर्घ करिअरमध्ये दीप्ती यांनी अनेक यादगार सिनेमे दिलेत. पण अख्ख्या करिअरमध्ये त्या नॉन ग्लॅमरस अ‍ॅक्ट्रेस म्हणूनच ओळखल्या गेल्या. भडक भूमिकांपासून त्यांनी जाणीवपूर्वक स्वत:ला दूर ठवेले.
3 / 10
चमको या डिटर्जंट पावडरच्या जाहिरातीतून दीप्ती नवल घराघरात पोहोचल्या. जाहिरातीतील हा चेहरा सर्वांच्या डोळ्यांत भरला.
4 / 10
दीप्ती नवल यांच्यावर यश, पैसा, प्रसिद्धीची बरसात झाली पण खासगी आयुष्यात मात्र त्या कायम एकाकी राहल्यात. दिग्दर्शक प्रकाश झा यांच्यासोबत दीप्तींनी लग्न केले. पण 17 वर्षांनंतर दोघांचा घटस्फोट झाला.
5 / 10
घटस्फोटानंतर दीप्ती आयुष्यात एकाकी पडल्या. यादरम्यान त्यांनी एक मुलगी दत्तक घेतली. पण आयुष्यातील जोडीदाराची उणीव त्यांना भासू लागली.
6 / 10
आयुष्याच्या या वळणावर त्यांच्या आयुष्यात एका व्यक्तीची एन्ट्री झाली. होय, सुप्रसिद्ध गायक पंडित जसराज यांचा पुतण्या व अभिनेते विनोद पंडित यांच्या रूपात दीप्तींना नवे प्रेम मिळाले.
7 / 10
दीप्ती भावी आयुष्याची स्वप्नं रंगवू लागल्या. बघता बघता दीप्ती व विनोद पंडित यांचा साखरपुडाही झाला. पण लग्न कदाचित नियतीला मंजुर नसावे. एकीकडे लग्न ठरले आणि दुसरीकडे विनोद पंडित यांचे कर्करोगाने निधन झाले.
8 / 10
विनोद पंडित यांच्या निधनाने दीप्ती पुन्हा एकाकी पडल्या. नियतीचा हा क्रूर खेळ पाहून आतून उन्मळून पडल्या. पण कालांतराने त्यांनी स्वत:ला सांभाळले आणि पुन्हा अ‍ॅक्टिंगकडे वळल्या. विनोद पंडित यांच्या निधनानंतर दीप्तींनी लग्न केले नाही. आजही त्या एकाकी आयुष्य जगत आहेत.
9 / 10
सध्या त्या मनोरूग्णांसाठी काम करत आहेत. मुलींच्या शिक्षणासाठीही त्या कार्य करत आहेत.
10 / 10
याशिवाय विनोद पंडित यांच्या नावाने असलेल्या ‘विनोद पंडित चॅरिटेबल ट्रस्ट’शी जुळलेल्या आहेत. कवयित्री, चित्रकार आणि फोटोग्राफर अशीही त्यांची ओळख आहे.
टॅग्स :दीप्ती नवल