Join us  

‘या’ अभिनेत्रींनी थाटला एनआरआयशी संसार!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2018 10:04 AM

अभिनेत्री काजोल, करिना कपूर, ट्विंकल खन्ना, ऐश्वर्या राय-बच्चन या अशा अभिनेत्री आहेत, ज्यांनी त्यांच्या को-स्टारसोबत लग्न केले. अनुष्का शर्माने ...

अभिनेत्री काजोल, करिना कपूर, ट्विंकल खन्ना, ऐश्वर्या राय-बच्चन या अशा अभिनेत्री आहेत, ज्यांनी त्यांच्या को-स्टारसोबत लग्न केले. अनुष्का शर्माने क्रिकेटरला जीवनसाथी बनविले तर, असिनने एका उद्योगपतीशी विवाह केला. एकूणच इंडस्ट्रीमधील बहुतांश अभिनेत्रींनी देसी जीवनसाथी निवडला. मात्र काही अभिनेत्री अशाही आहेत, ज्यांनी एनआरआय (अनिवासी भारतीय) तथा विदेशात असलेल्या भारतीय वंशाच्या तरुणांशी संसार थाटला. त्याचाच आढावा घेणारा हा वृत्तांत...माधुरी दीक्षित८० आणि ९० च्या दशकात लीडिंग लेडी आणि धक धक गर्ल माधुरी दीक्षित हिने १९९९ मध्ये कॅलिफोर्नियाच्या कार्डिओवेस्कुलर सर्जन श्रीराम माधव नेने यांच्याशी लग्न केले. या दाम्पत्याला दोन मुले असून, मोठा मुलगा अरीनचा जन्म २००३ साली, तर रायनचा जन्म २००५ साली झाला. लग्नानंतर तब्बल एक दशक विदेशात राहिल्यानंतर माधुरी आपल्या संपूर्ण परिवारासह भारतात परतली आहे. शिल्पा शेट्टीअभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची भेट लंडन येथे झाली होती. बिग ब्रदर (२००७) हा रिअ‍ॅलिटी शो जिंकल्यानंतर शिल्पा लंडनमध्ये प्रचंड पॉप्युलर झाली होती, तर राजदेखील उद्योग जगतात लोकप्रिय होता. या दोघांना दोन वर्षे डेटिंग केल्यानंतर २००९ मध्ये लग्न केले. या दाम्पत्याला विआन नावाचा मुलगा असून, त्याचा जन्म २०१२ मध्ये झाला. कनिका कपूरबेबी डॉलसह बºयाचशा हिट गाण्यांना आपला आवाज देणारी गायिका कनिका कपूर हिने वयाच्या १८व्या वर्षीच एनआरआय उद्योगपती राज चंडोक यांच्याशी विवाह केला. या दाम्पत्याला तिने मुले आहेत. (दोन मुली अयाना, समारा आणि एक मुलगा युवराज) राजबरोबर कनिकाने २०१२ मध्ये घटस्फोट घेतला. सध्या ती तिन्ही मुलांचा सांभाळ करीत आहे. शिल्पा शिरोडकर ९० च्या दशकात आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण करणारी अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिने ११ जुलै २००० रोजी युके बेस्ड बॅँकर अपरेश रंजित याच्याशी विवाह केला. २००३ मध्ये शिल्पाने अनुष्का नावाच्या मुलीला जन्म दिला. शिल्पा अखेरीस ‘बारूद’ (२०१०) या चित्रपटात झळकली होती. मीनाक्षी शेषाद्री ‘हिंरो, घायल, दामिनी, घातक, शहंशाह, तुफान, दिलवाला, आंधी और तुफान’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीने १९९५ मध्ये यूएस बेस्ड इन्वेस्टमेंट बॅँकर हरिश मैसूर याच्या विवाह केला. पुढे अमेरिकेतील टेक्सासमध्ये स्थायिक झाली. मीनाक्षीला मुलगी केंद्रा आणि मुलगा जोश नावाची दोन मुले आहे. लग्नानंतर मीनाक्षीने बॉलिवूडला गुडबाय केले. पूजा बत्रा‘विरासत, हसीना मान जाएगी आणि नायक’ यांसारख्या चित्रपटात झळकलेली पूजा बत्रा हिने २००२ मध्ये कॅलिफोर्निया बेस्ट आॅर्थोपेडिक सर्जन सोनू एस वालिया याच्याशी विवाह केला. पुढे २०११ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. तिला अखेरीस ‘एबीसीडी-२’मध्ये कॅमिओ करताना बघण्यात आले.