Join us  

'तारे जमीन पर'मधील आमिरचा स्टुडंट ईशानचा बदलला लूक, २६ वर्षीय दर्शील आता दिसतो खूप हॅण्डसम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 12:28 PM

1 / 9
आमिर खानचा लोकप्रिय चित्रपट 'तारे जमीन पर' पाहणे लोकांना आजही आवडते. २००७ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने लोकांची मने तर जिंकलीच, पण लोकांना रडवलेही.
2 / 9
आमिर खानशिवाय या चित्रपटातील त्याचा विद्यार्थी दर्शील सफारीचा अभिनयही प्रेक्षकांना आवडला होता. अलीकडेच तारे जमीन परचा सीक्वल सितारे जमीन परची घोषणा करण्यात आली.
3 / 9
अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला १६ वर्षांनंतरचा दर्शील सफारीचा लेटेस्ट फोटो दाखवणार आहोत. १६ वर्षात २६ वर्षांच्या दर्शील सफारीचा म्हणजेच लहान इशान अवस्थीचा लूक खूप बदलला आहे.
4 / 9
दर्शील सफारी आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये दिसला आहे. जरी या चित्रपटांबद्दल फार लोकांना माहिती नाही. अशा परिस्थितीत आम्ही तुमच्यासाठी दर्शीलचे काही लेटेस्ट फोटो घेऊन आलो आहोत. ज्यात तो खूपच वेगळा दिसतो आहे.
5 / 9
दर्शील सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत.
6 / 9
दर्शीलने नुकतेच त्याचे काही फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये तो खूपच सुंदर दिसत होता. हे शेअर करताना त्याने 'जेव्हा आपण युनिव्हर्सवर हसतो, तेव्हा युनिव्हर्सदेखील स्माईल बॅक करतो' असे कॅप्शन दिले होते.
7 / 9
या फोटोमध्ये दर्शील सफारी खूपच बदललेला दिसत आहे, ज्याला पाहून लोकांनी त्याच्या फोटोवर कमेंटही केल्या आहेत.
8 / 9
फोटोवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'ईशान, आधी तुझा गृहपाठ पूर्ण कर आणि मग बाहेर जा'.
9 / 9
तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, 'मी तुला पाहिले तेव्हा तू खूप लहान होतास, आता तू मोठा झाला आहेस. बॉलिवूडमध्ये तू कधी पुनरागमन करणार आहेस?
टॅग्स :दर्शील सफारीआमिर खान