Join us

Shruti Haasan : "या शब्दाची मला खूप भीती वाटते..."; लग्नाच्या प्रश्नावर श्रुती हसनने दिलं 'असं' उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 4:00 PM

1 / 8
श्रुती हसन तिच्या लूक आणि स्टायलिश अंदाजामुळे अनेकदा चर्चेत असते. याशिवाय अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याची देखील चर्चा रंगलेली असते. शंतनू हजारिकासोबत श्रुती रिलेशनशिपमध्ये आहे. तिने हे कधीच इतरांपासून लपवून ठेवलं नाही.
2 / 8
अभिनेत्रीला अशातच तिच्या लग्नाबद्दल अनेकदा प्रश्न विचारण्यात आले आहेत. याच दरम्यान पुन्हा एकदा श्रुतीला तिच्या लग्नाबद्दल विचारण्यात आलं आणि ती देखील यावर मोकळेपणाने बोलली.
3 / 8
श्रुती हसनने स्पष्टपणे सांगितलं की, सध्या तिचा लग्नाबाबत कोणताही विचार नाही. हिंदुस्तान टाइम्सशी संवाद साधताना 'मला लग्न या शब्दाची खूप भीती वाटते' असं म्हटलं आहे.
4 / 8
'या शब्दांत एवढं काही आहे की मला खरोखच याबाबत विचार करायचा नाही. मी त्याच्यासोबत राहून चांगलं काम करत आहे. एकत्र चांगला वेळ घालवत आहे आणि यामध्ये मी खूप खूश आहे. हे लग्नापेक्षा चांगलं नाही का?' असं श्रुतीने म्हटलं आहे.
5 / 8
अभिनेत्रीने तिचं आणि तिचा प्रियकर शंतनू यांच्यातील रिलेशनशिप आणि बॉन्डबाबत सांगितलं. 'आम्ही एकमेकांसाठी आहोत आणि कठीण काळात देखील एकमेकांना साथ देतो, सपोर्ट करतो.'
6 / 8
'तुमच्या संघर्षाच्या वेळी तुमच्या सोबत कोणीतरी असेल तर बरं वाटतं. सर्वकाही एकट्याने हाताळण्यापेक्षा हे चांगलं आहे. आपण जे शेअर करतो त्यापेक्षा चांगलं काही आहे असं मला वाटत नाही' असंही श्रुतीने सांगितलं.
7 / 8
श्रुती हसन नुकतीच वाल्टेयर वीरय्या चित्रपटात दिसली होती. केएस रवींद्र यांनी दिग्दर्शित केलेला हा एक्शन ड्रामा चित्रपट होता. या चित्रपटात श्रुतीशिवाय चिरंजीवी आणि रवी तेजा देखील दिसले होते.
8 / 8
श्रुती आता प्रभाससोबत 'सालार' या एक्शन थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. अभिनेत्रीचे असंख्य चाहते आहेत. ती नेहमीच सोशल मीडियावर एक्टिव्ह असून तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
टॅग्स :श्रुती हसन