Join us  

काही सेकंदाच्या या जाहिरातीसाठी शिल्पा शेट्टीला मिळणार होते 10 कोटी, पण...!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 2:04 PM

1 / 9
शिल्पा शेट्टी फिटनेसची किती काळजी घेते, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. पण यासाठी कुठलाही शॉर्ट कट शिल्पाला मान्य नाही. स्लिमिंग पिल्सवर तिचा अजिबात विश्वास नाही.
2 / 9
पौष्टिक आहार आणि योगा यावर ती विश्वास ठेवते. याच विश्वासापोटी शिल्पाने एक 10 कोटींची जाहिरात नाकारली होती.
3 / 9
होय, शिल्पाला एका स्लिमिंग पिल्सच्या जाहिरातीसाठी विचारणा झाली होती. यासाठी तिला 10 कोटी रूपये देण्यास मेकर्स तयार होते.
4 / 9
पण शिल्पाने ही जाहिरात धुडकावून लावली होती. याचे कारण एकच होते, फिटनेसच्या या पद्धतीवर तिचा अजिबात विश्वास नव्हता.
5 / 9
स्लिमिंग पिल्सचा परिणाम लगेच दिसतो म्हणून लोक याकडे आकर्षित होत असतीलही पण नियमित वर्कआऊट व पौष्टिक आहार यापेक्षा उत्तम काहीही नाही, असे शिल्पाचे ठाम मत आहे.
6 / 9
ज्यावर माझा स्वत:चा विश्वास नाही, त्या गोष्टी मी करणार नाही, असे शिल्पा एका मुलाखतीत म्हणाली होती.
7 / 9
शिल्पाच्या फिटनेसचे अनेक चाहते आहेत. बॉलिवूडमधील फिट अभिनेत्रींमध्ये शिल्पाची गणना केली जाते.
8 / 9
शिल्पा नित्यनेमाने योगा करते. तसेच तिच्या डाएटकडे विशेष लक्ष देते. त्यामुळे शिल्पा शेट्टी आजही तितकीच सुंदर दिसते.
9 / 9
शिल्पा सोशल मीडियावर सक्रिय असून ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
टॅग्स :शिल्पा शेट्टी