Join us  

PICS : शमिता शेट्टी व राकेश बापटचा व्हॅलेन्टाईन डेच्या मुहूर्तावर साखरपुडा? अलिबागला होणार फंक्शन?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 5:01 PM

1 / 7
बॉलिवूडचं आणखी एक कपल लग्न करणार असल्याच्या चर्चा जोरात सुरू आहेत. होय, हे कपल म्हणजे शमिता शेट्टी व राकेश बापट.
2 / 7
उद्या व्हॅलेन्टाईन डेच्या मुहूर्तावर दोघं साखरपुडा करणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं आहे. कारण आहेत, दोघांचे फोटो.
3 / 7
होय, शमिता व राकेश अलीकडे मुंबईतील एका ज्वेलरी स्टोअरबाहेर स्पॉट झाले होते. त्यानंतर त्यांच्या साखरपुड्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे. अशात शमिता राकेश हे दोघं शेट्टी कुटुंबासह अलिबागला रवाना झालेत.
4 / 7
अलिबागला रवाना होत असतानाचे शमिता व राकेशचे फोटो सध्या चर्चेत आहेत. या फोटोत शमिता शेट्टीसोबत तिची आई सुनंदा शेट्टीही दिसत आहे.
5 / 7
हे फोटो विरल भयानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. शमिताची बहीण आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीही आपल्या दोन मुलांसह अलिबागला रवाना झाली आहे.
6 / 7
‘व्हॅलेंटाइन डे’ च्या एक दिवस आधी शमिता-राकेश कुटुंबासोबत अलिबागला रवाना झाल्याने त्यांच्या साखरपुड्याची चर्चा सुरू झाली आहे.
7 / 7
शिल्पा शेट्टी व्हाईट टी-शर्ट आणि स्किन कलरच्या पँटमध्ये मुलगी समिशाला घेऊन कॅमे-यासमोर पोझ देताना दिसली.
टॅग्स :शिल्पा शेट्टीराकेश बापट