Join us

SEE PICS : ​‘या’ ‘मिस्ट्री बॉय’ला भररस्त्यात मिठी मारताना दिसली खुशी कपूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 12:22 IST

श्रीदेवींच्या निधनानंतर सगळ्यांचे लक्ष त्यांच्या दोन्ही मुलींवर आहे. त्यामुळेच जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांच्याशी संबंधित लहान-सहान गोष्टींकडे लोकांच्या ...

श्रीदेवींच्या निधनानंतर सगळ्यांचे लक्ष त्यांच्या दोन्ही मुलींवर आहे. त्यामुळेच जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांच्याशी संबंधित लहान-सहान गोष्टींकडे लोकांच्या नजरा आहेत. आईच्या निधनानंतर काहीच दिवसांत  जान्हवी आपल्या डेब्यू चित्रपटाच्या शूटींगवर परतली. ‘धडक’च्या सेटवरचे तिचे काही फोटोही व्हायरल झालेत. आता जान्हवीची लहान बहीण खुशी कपूर चर्चेत आहेत. होय, एका मिस्ट्री बॉयसोबतचे तिचे फोटो सध्या वेगाने व्हायरल होत आहेत. खुशीने व्हाईट शर्ट आणि ब्लॅक ट्राऊजर घातलेले आहे आणि तिच्या हातात जॅकेट आहे.या काळ्या जॅकेटने खुशी स्वत:चा चेहरा लपवताना दिसतेय. हसत हसत खुशी या मिस्ट्री बॉयला भेटले, त्याच्याशी बोलते, त्याला मिठी मारते आणि मग निघून जाते, असे या फोटोत दिसतेय.ALSO READ : श्रीदेवीची लहान मुलगी खुशी कपूर हिने घेतला मोठा निर्णय!!तूर्तास या फोटोमधील हा मिस्ट्री बॉय कोण, हे स्पष्ट झालेले नाही. पण खुशी त्याला भेटताना आनंदी आहे, हे मात्र स्पष्ट दिसतेय. मध्यंतरी खुशी मॉडेलिंगमध्ये हात आजमावणार, अशी बातमी आली होती. खुशीला इंटरनॅशनल मॉडेलिंगमध्ये करिअर करायचे आहे. तूर्तास खुशी आपले शिक्षण पूर्ण करतेय. पण ते पूर्ण होताच खुशी मॉडेलिंगच्या ट्रेनिंगसाठी विदेशात जाऊ शकते, असे या वृत्तात म्हटले गेले होते. तसे पाहता खुशीसाठी मॉडेलिंगचे जग नवे नाही. यापूर्वी अनेकदा खुशीने मॉडेलिंग केले आहे.  निधनाच्या काही दिवस  आधी श्रीदेवी खुशीसोबत लॅक्मे फॅशन वीकमध्ये पोहोचल्या होत्या. तेव्हा  सगळ्यांच्या नजरा खुशीवरचं खिळल्या होत्या. तिच्या या लुकचे सर्वाधिक कौतुक झाले होते. यादरम्यान खुशीने अतिशय सीजलिंग स्लीव्हलेस गाऊन परिधान केला होता.  ि