Join us  

संजय लीला भन्साळींची भाची आणि अभिनेत्री शर्मिन सहगलने अमन मेहतासोबत बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 8:47 PM

1 / 7
बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची भाची आणि अभिनेत्री शर्मिन सहगल विवाहबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
2 / 7
अभिनेत्री शर्मिन सहगलने गेल्या वर्षी अमन मेहतासोबत एंगेजमेंट केली होती. आता ते विवाह बंधनात अडकले आहे. सध्या सोशल मीडियावर शर्मिन आणि अमनच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत.
3 / 7
सोशल मीडियावर समोर आलेल्या या फोटोंमध्ये शर्मिन आणि अमन लग्नाचे विधी पूर्ण करताना दिसत आहेत.
4 / 7
शर्मिन सहगलने लग्नासाठी ऑफ व्हाइट कलरचा लेहेंगा परिधान केला आहे. भारी मॅचिंग ज्वेलरी आणि खुल्या कुरळे केसांनी तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.
5 / 7
तर शर्मिनचा वर म्हणजेच अमन मेहताने फोटोंमध्ये पांढरी शेरवानी घातली आहे. ज्यासोबत तिने वधूच्या लेहेंग्याशी जुळणारी शाल परिधान केली होती.
6 / 7
शर्मिनच्या मेहेंदीची झलकही एका फोटोत पाहायला मिळते. शर्मीनच्या मेहेंदीमध्ये तिच्या कुत्र्याचा आणि तिच्या आवडत्या पिझ्झाचा फोटो आहे.
7 / 7
शर्मिनने २०१९ मध्ये ‘मलाल’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 'अतिथी देव भव' या चित्रपटात ही अभिनेत्री दिसली होती. याशिवाय नुकतीच शर्मीन 'हिरामंडी'मध्ये दिसली होती.
टॅग्स :संजय लीला भन्साळी