Join us  

सलमान खान राहत असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटची किंमत किती माहितीये?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 7:01 PM

1 / 10
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर रविवारी(१४ एप्रिल) पहाटे ५ वाजताच्या सुमारास दोन अज्ञांताकडून हवेत गोळीबार करण्यात आला.
2 / 10
याबाबत पोलिसांनी FIR दाखल केला असून याचा तपास सुरू आहे. घराबाहेर गोळीबारानंतर सलमानने कुटुंबीयांबाबत चिंता व्यक्त केली होती.
3 / 10
सलमानचं वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर अनेकदा चाहते गर्दी करतात. या अपार्टमेंटच्या बाल्कनीतून सलमान चाहत्यांना त्याची झलक दाखवत असतो.
4 / 10
गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये सलमान त्याचे आईवडील सलीम खान आणि सुशीला यांच्याबरोबर राहतो.
5 / 10
खान कुटुंबातील सलमान हा सर्वात श्रीमंत खान आहे. त्याचं नेटवर्थ जवळपास ३००० कोटींच्या घरात आहे.
6 / 10
सलमानचं पनवेल येथे फार्महाऊस आहे. याशिवाय दुबईतही त्याने बुर्ज खलिफाजवळ घर घेतलं आहे.
7 / 10
भाईजानकडे लक्झरी गाड्यांचं कलेक्शन आहे. मर्सिडीज बेंझ, ऑडी, बीएमडब्लू अशा जवळपास ३१ कोटींच्या गाड्या त्याच्याकडे आहेत.
8 / 10
कोट्यवधींची प्रॉपर्टी असूनही सलमान गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये 1BHK मध्ये राहतो. सलमान वरच्या मजल्यावर तर खालच्या मजल्यावर त्याचे आईवडील राहतात.
9 / 10
सलमानचं वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट समुद्रकिनाऱ्याच्या समोर आहे. सी फेसिंग असलेल्या या गॅलेक्सी अपार्टमेंटची किंमत कोटींच्या घरात आहे.
10 / 10
सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटची किंमत तब्बल १०० कोटी इतकी आहे.
टॅग्स :सलमान खानसेलिब्रिटीगोळीबार