Join us  

Rashmika Mandanna Birthday: बाबो! अवघ्या 27 वर्षांची रश्मिका मंदाना आहे इतक्या कोटींची मालकीण...!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2023 12:58 PM

1 / 13
साऊथ सेन्सेशन रश्मिका मंदानाच्या मिलियन डॉलर स्माईलवर चाहते फिदा आहेत. कर्नाटकच्या कुर्गमध्ये राहणाऱ्या रश्मिकाने वयाच्या २६ व्या वर्षी जे यश मिळवलंय ते कौतुकास्पद आहे.
2 / 13
साऊथमध्ये नाव कमावल्यानंतर रश्मिका बॉलिवूडकडे वळली. आत्तापर्यंत सुमारे १५ सिनेमांत काम करणाऱ्या या सामी सामी गर्लचा अख्खा प्रवास अद्भूत करणारा आहे.
3 / 13
आज रश्मिकाचा वाढदिवस. कुर्गमध्ये जन्मलेल्या रश्मिकाने तिथेच आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. यानंतरच्या शिक्षणासाठी ती बेंगलोरला गेली. तिच्याकडे तीन पदव्या आहेत.
4 / 13
रश्मिकाने इंग्रजी साहित्य, मानसशास्त्र व पत्रकारितेत बॅचलर ड्रिग्री घेतली आहे. अभिनयात जशी ती अव्वल आहे, तशीच शिक्षणातही ती अव्वल होती.
5 / 13
रश्मिका अभिनयाकडे कशी वळली, तर २०१४ साली तिच्या कॉलेजमध्ये एक इव्हेंट झाला. हाच इव्हेंट तिच्या करिअरला नवी दिशा देणारा ठरला.
6 / 13
कॉलेजमध्ये तिने क्लीन ॲण्ड क्लीअर फ्रेश फेसचा खिताब जिंकला. एका डायरेक्टरची नजर तिच्यावर पडली आणि त्यानेच तिला 'किरीक पार्टी' या सिनेमात पहिला ब्रेक दिला.
7 / 13
रश्मिकाचा पहिलाच सिनेमा सुपरडुपर हिट झाला. तिचा डेब्यू सिनेमा त्यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा होता. मग काय, यानंतर रश्मिकाने कधीच मागे वळून बघितलं नाही.
8 / 13
आज रश्मिका मोठी अभिनेत्री आहे. आज नेम फेम सगळं काही तिच्याकडे आहे. पण याच रश्मिकाच्या आईवडिलाकंडे कधीकाळी खेळणी घेण्याइतकेही पैसे नव्हते.
9 / 13
रश्मिकाने एका मुलाखतीत याबद्दल सांगितलं होतं. एकेकाळी घराचं भाडं देण्यासाठीही माझ्या आईवडिलांकडे पैसे नव्हते. माझ्यासाठी ते एक खेळणंही खरेदी करू शकत नव्हते, असं ती म्हणाली होती.
10 / 13
रश्मिकाने ॲक्टिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तिच्या आईवडिलांनी प्रचंड विरोध केला होता. अर्थात रश्मिकाने वेळीच त्यांची समजूत काढली आणि आईवडिल आनंदाने राजी झालेत.
11 / 13
रश्मिका तिच्या चित्रपटांमधून तगडी कमाई करते. दरवर्षी ती जवळपास 8 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमावते.एका चित्रपटासाठी ती तीन ते चार कोटी रुपयांचं मानधन घेते.
12 / 13
अवघ्या 27 व्या वर्षी तिची एकूण 65 कोटी रुपयांची संपत्ती आहे. चित्रपटांशिवाय ती जाहिराती आणि मॉडेलिंगमधूनही पैसा कमावते. चित्रपटांशिवाय ती जाहिराती आणि मॉडेलिंगमधूनही पैसा कमावते.
13 / 13
कमाईच्या आणि संपत्तीच्या बाबतीत रश्मिकाने बॉलिवूडच्या स्टारकिड्सलाही मागे टाकलं आहे. सारा अली खान आणि अनन्या पांडे या दोघी मोठ्या अभिनेत्री असल्या तरी संपत्तीच्या बाबतीत त्या रश्मिकाच्या मागेच आहेत.
टॅग्स :रश्मिका मंदाना