रणवीर-वाणीने धरला ‘ढिंक-चिका’ वर ठेका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2016 19:51 IST
रणवीर सिंग आहे म्हटल्यावर धम्माल, मजा, मस्ती तर आलीच नाही का? अन् त्याच्यासोबत वाणी कपूर मग काय? ‘बेफिक्रे ’जोडी ...
रणवीर-वाणीने धरला ‘ढिंक-चिका’ वर ठेका!
रणवीर सिंग आहे म्हटल्यावर धम्माल, मजा, मस्ती तर आलीच नाही का? अन् त्याच्यासोबत वाणी कपूर मग काय? ‘बेफिक्रे ’जोडी आली की धम्माल असते असे त्यांच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर येऊ लागल्या आहेत. नुकतेच असे सेलिब्रेशनचे वातावरण ‘बिग बॉस’ च्या सेटवर पहावयास मिळाले. तिथे त्यांनी ‘ढिंक चिका’, ‘बेबी को बेस पसंद है’ या गाण्यांवर डान्स करून उपस्थित सर्वांना त्यांच्या तालावर नाचवले. रणवीर सिंग आणि वाणी कपूर हे दोघे ‘बेफिक्रे’ च्या प्रमोशनसाठी सलमान खानच्या ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमध्ये आले होते. सुपरस्टार सलमान खान आणि रणवीर सिंग जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय झाले असेल याची कल्पना तुम्ही नक्कीच करू शकता. धम्माल, मस्ती, फन मध्ये वाणीही सहभागी झाली. मग तिथे सलमानची काही प्रसिद्ध गाणी त्यांनी सादर केली. ‘बिग बॉस’ च्या स्पर्धकांना त्यांनी ‘गुड लक’ देऊन कार्यक्रमातून रजा घेतली. दिग्दर्शक आदित्य चोप्रा याची रणवीर सिंग आणि वाणी कपूर यांच्या मुख्य भूमिकेतील ‘बेफिक्रे’ चित्रपटाकडून खुप अपेक्षा आहेत. रणवीर आणि वाणीसारखे गुणी कलाकार जर या चित्रपटात असतील तर बॉक्स आॅफिसचे आकडे नक्कीच हलवून टाकणार, असे वाटतेय. यशराज फिल्म्स निर्मित या चित्रपटाकडे चाहत्यांचेही विशेष लक्ष लागून राहिले आहे. चित्रपटातील गाणी आऊट झाली असली तरीही कथानकाविषयी उत्सुकता आजही चाहत्यांना आहे.