Join us  

PICS : बाप रे बाप डोक्याला ताप! तुरूंगाबाहेर मीडियाला पाहताच राज कुंद्रानं मारला डोक्यावर हात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 2:34 PM

1 / 8
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा (Raj Kundra walks out of jail a day after getting bail) अखेर तुरूंगातून बाहेर आला. जामीनावर आज त्याची सुटका झाली.
2 / 8
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पोर्नोग्राफी प्रकरणात 19 जुलै रोजी अटक केली होती. तब्बल 62 दिवसांनंतर राज कुंद्राला जामीन मंजूर करण्यात आला आहे.
3 / 8
राज कुंद्रा आता कारागृहातून बाहेर आला आहे. कारागृहातून बाहेर पडताचं राजचे काही फोटो व्हायरल होत आहेत.
4 / 8
ज्यामध्ये राजला टिळा लावल्याचं दिसून येत आहे. त्याच्या हातात एक पिवशी दिसतेय.
5 / 8
राज तुरूंगाबाहेर येताच, मीडियाने त्याला घेरलं. इतकं की, राज डोक्याला हात लावला. त्याचा हा फोटोही तुफान व्हायरल होतोय.
6 / 8
राज कुंद्रा अश्लील चित्रपटांप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलनं 1500 पानांची सप्लीमेंट्री चार्जशीट दाखल करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार या चार्जशीटमध्ये 43 जणांची साक्ष नोंदवण्यात आली आहे.
7 / 8
महत्त्वाचं म्हणजे पतीला जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर शिल्पाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या तिची ही पोस्ट चर्चेत आहे.
8 / 8
मोठ्या वादळानंतरही चांगल्या गोष्टी घडतात, असं लिहित शिल्पानं एक फोटो तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केला आहे.
टॅग्स :राज कुंद्राशिल्पा शेट्टी