Join us  

PHOTOS: तब्बल १३ वर्षांनंतर रिलीज होतोय जेनेलिया डिसूझाचा हा सिनेमा, जाणून घ्या याबद्दल

By तेजल गावडे | Published: November 10, 2020 7:08 PM

1 / 9
बॉलिवूड अभिनेत्री जेनेलिया डिसूजा लग्नानंतर बॉलिवूडपासून दुरावली आहे आणि तिच्या कमबॅकची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
2 / 9
दोन मुलांची आई झाल्यानंतर आता ती पुन्हा कमबॅकच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
3 / 9
दरम्यान आता तिने १३ वर्षांपूर्वी शूट केलेला चित्रपट आता रिलीज होत असल्याचे समजते आहे.
4 / 9
इट्स माय लाइफ असे या सिनेमाचे नाव असून हा चित्रपट आता २९ नोव्हेंबरला टेलिव्हिजनवर रिलीज होणार आहे.
5 / 9
ही माहिती खुद्द जेनेलियाने इंस्टाग्रामवर दिली आहे.
6 / 9
२००७ साली इट्स माय लाइफ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले होते.
7 / 9
या चित्रपटात जेनेलियासोबत हरमन बावेजा मुख्य भूमिकेत आहे.
8 / 9
‘इट्स माय लाइफ’ हा सिनेमा अनीस बज्मी यांनी दिग्दर्शित केला होता. ‘बोम्मारिल्लू’ या तेलगू सिनेमाचा हा रिमेक आहे.
9 / 9
टॅग्स :जेनेलिया डिसूजाहरमन बावेजा