Join us  

PHOTOS: अंकिता लोखंडेची बहिण अशिताने केले ग्लॅमरस फोटोशूट, लवकरच करणार अ‍ॅक्टिंगच्या जगतात एन्ट्री

By तेजल गावडे | Published: October 12, 2020 9:35 PM

1 / 9
अंकिता लोखंडे टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
2 / 9
पवित्र रिश्ता मालिकेतून अंकिताने सिनेइंडस्ट्रीत पाऊल टाकले होते. आता तिची लहान बहिणदेखील तिच्या पाऊलांवर पाऊल टाकत लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.
3 / 9
अशिता लोखंडेने निर्णय घेतला आहे की मोठी बहिण अंकिता लोखंडेप्रमाणे अभिनय क्षेत्रात नशीब आजमवणार आहे.
4 / 9
अंकिता लोखंडेला अभिनयात एन्ट्री करण्यापूर्वी कुटुंबाची परवानगी घेण्यासाठी खूप धडपड करावी लागली होती. मात्र आता अशिताला संपूर्ण कुटुंबाचा पाठिंबा मिळतो आहे.
5 / 9
अशिताचे फोटो अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर शेअर करत तिचे कौतूक केले आहे आणि तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
6 / 9
अशिता लोखंडेने एकानंतर एक बरेच फोटोशूट केले आहे. तिचा नवीन अवतार पाहून अनेकजण थक्क झाले आहेत.
7 / 9
अशिताच्या या नव्या फोटोशूट काही कालावधीतच सोशल मीडियावरील युजर्सची पसंती मिळाली आहे.
8 / 9
अशिताने पहिल्यांदाच फोटोशूट केले आहे. मात्र या फोटोंमध्ये ती खूप कॉन्फिडंट वाटत आहे.
9 / 9
अशिताचे निकनेम ज्योती आहे. घरातले तिला याच नावाने बोलवतात.
टॅग्स :अंकिता लोखंडे