Join us  

Parineeti-Raghav Wedding: 'राघव की दुल्हनिया', परिणिती चोप्रा-राघव चड्ढा यांच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 10:38 AM

1 / 8
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप खासदार राघव चड्ढा यांनी रविवारी(२४ सप्टेंबर) लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. उदयपूरमधील लीला पॅलेस येथे त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला.
2 / 8
परिणीती आणि राघव यांच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता राघव आणि परिणीती यांच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो समोर आले आहेत. लग्नानंतर परिणीतीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन लग्नातील काही खास क्षणांचे फोटो शेअर केले आहेत.
3 / 8
परिणीती आणि राघव यांनी लग्नासाठी अत्यंत साधा लूक केला होता. परिणीतीने लग्नासाठी खास क्रिम रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला होता. खड्यांची मॅचिंग ज्वेलरीमुळे नववधू परिणीतीचं सौंदर्य खुललं होतं.
4 / 8
तर राघव चड्ढा यांनी पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केला होता. डोक्यावर फेटा बांधल्यामुळे राघव चड्ढा अगदी राजबिंडासारखे दिसत होते. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
5 / 8
लग्नसोहळ्यात लक्ष वेधून घेतलं ते परिणीतीच्या चुनरीने(ओढणी). परिणीतीने लग्नात घेतलेल्या चुनरीवर 'राघव' असं नाव लिहिलं होतं. तिच्या लग्नातील साध्या लूकचं नेटकरी कौतुक करत आहेत.
6 / 8
परिणीती आणि राघव यांनी कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत सात फेरे घेत लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नासाठी लीला पॅलेसमधील खास महाराजा सूट बुक करण्यात आला होता.
7 / 8
परिणीतीने लग्नाचे फोटो शेअर करत 'नाश्ताच्या टेबलवरील पहिल्या संभाषणापासूनच आपल्याला माहीत होतं. या दिवसाची मी खूप काळापासून वाट पाहत होते. आता आम्ही मिस्टर आणि मिसेस झालो आहेत. एकमेकांशिवाय आम्ही राहू शकत नाही,' असं म्हटलं आहे.
8 / 8
परिणीतीच्या या पोस्टवर कमेंट चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक सेलिब्रिटींनीही परिणीती आणि राघव चड्ढा यांचं अभिनंदन केलं आहे.
टॅग्स :परिणीती चोप्रासेलिब्रिटीव्हायरल फोटोज्