Join us  

न्यूड सीन्स दिले नाही म्हणून संपलं करिअर...! नर्गिस फाखरीचा शॉकिंग खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2021 3:55 PM

1 / 9
‘रॉकस्टार’ या चित्रपटातील रणबीर कपूरची हिरोईन तुम्हाला आठवत असेलच. होय, आम्ही बोलतोय ते नर्गिस फाखरीबद्दल.
2 / 9
‘रॉकस्टार’नंतर नर्गिस चांगलीच लोकप्रिय झाली होती. अगदी ही खूप पुढे जाईल, असेही म्हटले जाऊ लागले होते. पण प्रत्यक्षात काही मोजके सिनेमे केल्यानंतर ही हिरोईन अचानक बॉलिवूडमधून गायब झाली.
3 / 9
याच नर्गिसने आता बॉलिवूडमधील कास्टिंग काऊचवर धक्कादायक खुलासा केला आहे. होय, मी न्यूड झाले नाही, मेकर्ससोबत रात्र घालवली नाही म्हणून मी बॉलिवूडमधून बाद झाले, असे तिने म्हटले आहे.
4 / 9
एका पोर्टलशी दिलेल्या मुलाखतीत ती करिअरवर बोलली. मला प्रसिद्धी आणि पैशाची अजिबात भूक नाही. ज्यासाठी मी न्यूड सीन्स देईल किंवा निर्माता-दिग्दर्शकासोबत रात्र घालवेल. मी ग्लॅमर दुनियेत आले पण स्वत:ला काही मर्यादा घालून घेतल्या. अर्थात याची मोठी किंमत मला चुकवावी लागली, असे ती म्हणाली.
5 / 9
बॉलिवूडमध्ये अनेक गोष्टींना मी नकार दिला आणि यामुळे अनेक संधी हातच्या घालवल्या. याचा खूप त्रासही झाला, असे ती म्हणाली.
6 / 9
या काही कारणांमुळे माझे करिअर संपले, याचे वाईट वाटले. आजही वाटते. पण आयुष्यात स्वत:ची काही तत्त्व असतात आणि जे या तत्त्वांवर चालतात, तेच जिंकतात, हे मी वेळोवेळी स्वत:च्या मनाला समजावत राहते, असे ती म्हणाली.
7 / 9
मी स्वत:शी प्रामाणिक आहे. दुस-यासमोर मी कशी आहे हे मला सिद्ध करायची गरज नाही. माझ्यासाठी माझी तत्त्व अधिक महत्त्वाची आहेत, असेही ती म्हणाली.
8 / 9
माझ्या तत्त्वांवर मी बॉलिवूडमध्ये आहे, याचा आनंद आहे. मी इंटिमेट सीन्सला सरळ नकार दिले. मॉडेलिंगमध्येीरअनेकवेळा मला नेकेड किंवा टॉपलेस शॉट्ससाठी विचारण्यात आले, पण मी त्यालाही नकार दिला. कारण मी त्यात कम्फर्टेबल नाही, असेही ती म्हणाली.
9 / 9
नर्गिस मद्र्रास कॅफे, किक, हाउसफुल 3, मैं तेरा हिरो आणि 2020 मध्ये आलेल्या तोरबाजमध्ये दिसली आहे.
टॅग्स :नर्गिस फाकरी