Join us

अभिनेत्रींशी नाव जुळल्याने ‘या’ क्रिकेटपटूंना करावा लागला ट्रोलचा सामना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 22:03 IST

क्रिकेट आणि बॉलिवूड कनेक्शन खूप जुने आहे. कारण बºयाच खेळाडूंचे बॉलिवूड अभिनेत्रींशी नाव जोडले गेले आहे. पुढे त्यांच्या अफेअरच्या ...

क्रिकेट आणि बॉलिवूड कनेक्शन खूप जुने आहे. कारण बºयाच खेळाडूंचे बॉलिवूड अभिनेत्रींशी नाव जोडले गेले आहे. पुढे त्यांच्या अफेअरच्या चर्चाही रंगल्या आहेत. शिवाय अजूनही या चर्चा रंगतच आहेत. काही दिवसांपूर्वीचाच किस्सा आहे. जेव्हा अभिनेत्री परिणिती चोपडाच्या एका ट्विटला अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने रिट्विट केले तेव्हा नेटकºयांनी दोघांच्या अफेअरच्या चर्चा अशा काही रंगविल्या की, हे दोघेही दंग झाले. मात्र असा सामना या दोघांनाच करावा लागला, असा नाही तर यापूर्वीही काही क्रिकेटपटूंना अशाप्रकारच्या ट्रोलचा सामना करावा लागला, त्याचा आढावा घेणारा हा वृत्तांत...हार्दिक पांड्या-परिणिती चोपडाभारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या सध्या त्याच्या खेळीपेक्षा भलत्याच कारणाने चर्चेत आहे. चर्चेत राहण्याचे कारण म्हणजे त्याने अभिनेत्री परिणिती चोपडाच्या एका ट्विटला रिट्विट केले होते. बस्स... हीच चूक ठरली असून, नेटकºयांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. त्याचे झाले असे की, परिणितीने एका सायकलचा फोटो पोस्ट केला होता. कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ‘सर्वात सुंदर जोडीदारासोबत सुंदर प्रवास, वाºयासंगे प्रेम’ परिणितीच्या या कॅप्शनला उत्तर देताना हार्दिकने लिहिले ‘मी याचा अंदाज लावू शकतो.’ दोघांच्या या टिवटिवाटचा अर्थ नेटिझन्सनी भलताच काढला. दोघांमध्ये काहीतरी खिचडी शिजत असावी, असे त्यांना वाटले. त्यामुळे युजर्सनी त्याला ‘मुलीकडे नव्हे तर खेळाकडे लक्ष दे’ असा सल्ला दिला. महेंद्रसिंग धोनी-दीपिका पादुकोणभारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एम. एस. धोनीच्या चाहत्यांची संख्या लक्षणीय आहे. करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये धोनीच्या बॅटिंगबरोबरच त्याच्या हेअरस्टाइलचीही चर्चा रंगायची. त्यातच धोनी मैदानावर उंचच्या उंच छक्के मारण्याबरोबर रॅम्पवर झळकू लागल्याने त्याच्या ग्लॅमरस अंदाजावर बॉलिवूडही फिदा झाले होते. नंतरच्या काळात त्याचे नाव अभिनेत्री दीपिका पादुकोण हिच्याशी जोडले गेले. त्यावेळी धोनी आणि दीपिका रिलेशनशिपमध्ये होते. परंतु ही बाब त्याच्या चाहत्यांना फारशी पचणी पडली नाही, त्यांनी त्याच्यावर सडकून टीका केली होती. विराट कोहली-अनुष्का शर्मा सोशल मीडियावर अभिनेत्रींमुळे एखाद्या क्रिकेटपटूला ट्रोल केले जाणे काही नवे नाही. विराट आणि अनुष्का शर्माला तर त्याचा नेहमीच सामना करावा लागतो. काही काळापूर्वी जेव्हा विराट आउट आॅफ फॉर्ममध्ये होता, तेव्हा लोकांनी त्याचा सर्व ठपका अनुष्कावर ठेवला होता. अनुष्कामुळेच विराट त्याचा नैसर्गिक खेळ खेळत नसल्याची टीका केली गेली. पुढे विराटने अनुष्काचा बचाव करताना लोकांच्या या टीकेचा निषेध केला. हा सिलसिला अजूनही सुुरू आहे. कारण बºयाचदा असे घडले की, जेव्हा अनुष्का स्टेडिअममध्ये उपस्थित असते तेव्हा तो मोठी खेळी करण्यास अपयशी ठरतो. अशात लोकांच्या हातात आयतेच कोलीत मिळते. रोहित शर्मा-सोफिया हयातभारतीय क्रिकेट संघाचा ओपनिंग बॅट्समॅन रोहित शर्मा यालादेखील ट्रोलिंगचा सामना करावा लागला. होय, आयटम गर्ल सोफिया हयातमुळे तो ट्रोल झाला होता. त्याचे झाले असे की, रोहित आणि सोफिया एका पार्टीत भेटले होते. पार्टीत सोफिया रोहितच्या गळ्यात पडून डान्स करीत होती. दोघांच्या या डान्सचा कोणीतरी फोटो काढला अन् सोशल मीडियावर व्हायरल केला. तेव्हा रोहितवर चहुबाजूने टीका करण्यात आली.