Join us

मलाइका अरोराचा स्पोर्टी लुक बघून तुम्ही व्हाल घायाळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2017 15:32 IST

पती अरबाज खान याच्याशी नुकताच घटस्फोट घेतलेल्या आयटम गर्ल मलाइका अरोराने खासगी आयुष्याचा आपल्या प्रोफेशनल आयुष्यावर किंचितही परिणाम न ...

पती अरबाज खान याच्याशी नुकताच घटस्फोट घेतलेल्या आयटम गर्ल मलाइका अरोराने खासगी आयुष्याचा आपल्या प्रोफेशनल आयुष्यावर किंचितही परिणाम न होऊ दिल्याचे दिसून येत आहे. मलाइका अरबाजसोबत असताना जशी लाइफ जगत होती, तशीच लाइफ ती अरबाजपासून विभक्त झाल्यानंतर जगत आहे. याची झलक नुकतीच बघावयास मिळाली असून, मलाइकाचा स्पोर्टी लुकमधील अंदाज घायाळ करणारा आहे. मुंबई, बांद्रा येथील सलून सेशनदरम्यान मलाइकाचे काही फोटो कॅमेºयात कैद करण्यात आले असून, फोटोंमधील मलाइकाचा स्पोर्टी अंदाज खूपच आकर्षित करणारा आहे. वास्तविक मलाइका नेहमीच पब्लिकली स्पॉट होत असते. बºयाचदा ती स्पोर्टी लुकमध्ये बघावयास मिळाली आहे; मात्र यावेळचा तिचा अंदाज खूपच प्रभावीत करणारा होता. बॉलिवूडमध्ये आयटम नंबरसाठी ओळखली जाणारी मलाइका तिच्या फिटनेसबाबत खूपच जागरूक आहे. ती नेहमीच जीम किंवा योगा क्लासमध्ये जाताना स्पॉट झालेली आहे. त्यामुळे आजही मलाइका आकर्षित दिसत असून, तिच्या अदा घायाळ करणाºया आहेत. फोटोमध्ये तुम्ही बघू शकाल की कशा पद्धतीने मलाइकाने फिगर मेंटेण्ड ठेवला आहे. काही दिवसांपूर्वीच बांद्राच्या कौटुंबिक न्यायालयाने अरबाज आणि तिच्या घटस्फोटाला मंजुरी दिली होती. तब्बल १८ वर्ष संसार केलेले हे जोडपे आता विभक्त झाले आहेत. घटस्फोटानंतर मलाइकाने अरबाजकडे १५ कोटी रुपयांची मागणी केल्याची चर्चा होती. अरबाजनेदेखील तिच्या सर्व अटी मान्य केल्याचे समजते. दरम्यान, अरबाज आता लवकरच एका विदेशी मॉडेलसोबत संसार थाटण्याच्या तयारीत आहे. तर मलाइका आपल्या मुलांसोबत आयुष्य जगत आहे. अभिनेता अर्जुन कपूर अन् मलाइकाच्या जवळीकतेमुळेच अरबाज अन् तिच्या संबंधात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मात्र अर्जुनने आमच्यात असे कुठलेच संबंध नसल्याचे वेळोवेळी स्पष्ट केले आहे. अशात यांच्या घटस्फोटामागील दुसरे कोणते कारण असू शकते, हे मात्र अजूनही गुलदस्त्यातच आहे.