Join us

जाणून घ्या कशी आहेत तुमच्या आवडत्या बॉलिवूड कलाकारांची घरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 15:13 IST

बॉलिवूड अभिनेता आणि अभिनेत्यांची घरे कशी असतात ही पाहाण्याची इच्छा प्रत्येक फॅनची असते. तुमच्या आवडत्या कलाकारांच्या घराची ही एक ...

बॉलिवूड अभिनेता आणि अभिनेत्यांची घरे कशी असतात ही पाहाण्याची इच्छा प्रत्येक फॅनची असते. तुमच्या आवडत्या कलाकारांच्या घराची ही एक सफर...आमिर खानआमिर खान मुंबईतील वांद्रे येथील बेल्ला विस्ता अपार्टंमेंटमध्ये राहातो. त्याचे घर 5000 सक्वेअर फिटचे असून भारतीय आणि युरोपियन मॉर्डन गोष्टींचा वापर करून घर सजवले आहे.अक्षय कुमारअक्षय कुमारचे घर हे जूहू बीचच्यासमोर आहे. त्याचे घर अतिशय प्रशस्त असून या घरात त्याच्यासोबत त्याची पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्ना, मुले आणि बहीण रहातात.अनिल कपूरअनिल कपूरची पत्नी ही स्वतः एक इंटेरियर डिझायनर आहे. त्यामुळे अनिलचे घर तिने खूपच चांगल्याप्रकारे सजवलेले आहे. त्याच्या घरातील लाँन अतिशय प्रशस्त आहे. तसेच त्याच्या घरात सगळ्या सुविधांनी युक्त असे जीम आहे. फरहान अख्तरमुंबईतील वांद्रे येथे 10 हजार सक्वेअर फुटचा फरहानचा भलामोठा बंगला आहे. फरहानने 2009मध्ये हे घर घेतले आहे. सलमान खानवांद्रेतील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये सलमान गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या कुटुंबियांसोबत राहातो. सलमान वांद्रेत भलामोठा बंगला बांधत असून लवकरच तो त्या बंगल्यात शिफ्ट होणार असल्याची चर्चा आहे. हेमा मालिनीहेमा मालिनीचा एक फ्लॅट गोरेगाव येथे आहे तर जुहू येथे तिचा भलामोठा बंगला आहे. या घराचे इंटेरियर प्रसिद्ध इंटेरियर कंपनीकडून करून घेण्यात आले आहे. शाहरुख खानशाहरुख खानचा मन्नत हा बंगला वांद्रे बँड स्टँड येथे आहे. या घरात सगळ्या अत्याधुनिक सुविधा आहेत. शाहरुखच्या घरात मोठी लायब्रेरी, जिम, स्विमिंग पूल, मिनी थिएटर आहे. तसेच घरात बार आणि स्पोर्टस् रूमदेखील आहे. अमिताभ बच्चनमुंबईतील जूहू येथे अमिताभ बच्चनचे प्रतिक्षा, जलसा आणि जनक असे तीन बंगले आहेत. अमिताभ त्याच्या कुटुंबियांसोबत प्रतीक्षा या बंगल्यात राहतो तर जलसादेखील प्रतीक्षाच्या अगदी जवळ आहे.रेखावांद्रेतील रेखाच्या घरासमोर बांबूचा भला मोठा दरवाजा आहे. त्यामुळे तिच्या घरातील काहीच दिसत नाही. घरातील काहीही दिसू नये यासाठी तुरुंगाच्या दरवाज्याप्रमाणे तिने हा दरवाजा बनवून घेतला आहे. सैफ अली खानसैफ अली खानचा गुजरातमधील पतौडी येथे एक मोठा बंगला आहे. तो मुंबईत वांद्रे येथे राहातो. तसेच भोपाळमध्येदेखील त्याने अनेक जागा घेतल्या आहेत. संजय दत्तसंजय दत्त पाली हिलमध्ये त्याच्या पत्नीसोबत राहातो.