Join us  

लग्नानंतर याच ठिकाणी साजरा होतो करिनाचा वाढदिवस, इतक्या कोटींची आहे मालकीण,SEE PICS

By सुवर्णा जैन | Published: September 21, 2020 10:22 AM

1 / 11
गुडगाव इथून २६ किमीवर असलेल्या पतौडी इथं असणारा हा महल म्हणजे पतौडी पॅलेस. नवाब पतौडी घराण्याची ही निशाणी असलेला हा आलिशान महल ८४ वर्षांपूर्वी बांधण्यात आला.
2 / 11
मन्सूर अली खान पतौडी अर्थात टायगर पतौडी यांचे वडील आणि छोटे नवाब सैफ अली खानचे आजोबा इफ्तिकार अली हुसेन यांनी १९३५ मध्ये हा आलिशान पॅलेस बांधला.
3 / 11
ऑस्‍टेलियाचे आर्किटेक्‍ट कार्ल मोल्‍ट हेंज यांच्‍या संकल्पनेतून या भव्य आणि आलिशान महालाची डिझाइन करण्यात आली.
4 / 11
टायगर पतौडी यांच्या पश्चात छोटे नवाब अभिनेता सैफ अली खान आणि त्याची पत्नी बेगम करीना कपूर खान हे या महालाची देखभाल करतात.
5 / 11
पतौडी पॅलेसला इब्राहिम कोठी असंही म्हटलं जातं. हा पॅलेस इतका आलिशान आणि भव्य आहे की पाहणाऱ्यांचे डोळे दिपून जातील. महालात भलीमोठी ड्रॉइंग रूम, एक देन नव्हे तर तब्बल सात बेडरूम आणि ड्रेसिंग रूम आहेत.
6 / 11
सैफ अली खान हा पतौडी घराण्याचा दहावा नवाब आहे. त्यानेच २०१४ साली पतौडी पॅलेसचं नुतनीकरण केलं.
7 / 11
सैफ आणि करिना कपूर खान इथं राहत नसले तरी पतौडी पॅलेसमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी इथं येतात. लग्नानंतर दरवर्षी करिनाचा वाढदिवसही इथंच साजरा करण्यात येतो.
8 / 11
सैफच्या या आलिशान महालात चित्रपटांचं शुटिंगही झालंय. 'मंगल पांडे', 'वीर-जारा' आणि 'रंग दे बसंती' या चित्रपटांचं शुटिंग या पतौडी पॅलेसमध्ये झालंय.
9 / 11
वेळेत वेळ काढून पतौडी पॅलेसमध्ये दोघे निवांत वेळ घालवतात.
10 / 11
सैफ आणि करिना दोघांनाही पतौडी पॅलेसमध्ये वेळ घालवायला आवडते.
11 / 11
नवाबांची बात न्यारी... नवाबांचे थाट काही औरच.. हेच यांचे हे रॉयल फोटो पाहून स्पष्ट होते.
टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान