हृतिक रोशन व सुजैन खान पुन्हा आले एकत्र!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2017 12:58 IST
उण्यापु-या तीन वर्षांपूर्वी हृतिक रोशन व सुजैन खान हे दोघे पती-पत्नी विभक्त झालेत. त्यांचा घटस्फोटही झाला. पण मुलांसाठी का ...
हृतिक रोशन व सुजैन खान पुन्हा आले एकत्र!
उण्यापु-या तीन वर्षांपूर्वी हृतिक रोशन व सुजैन खान हे दोघे पती-पत्नी विभक्त झालेत. त्यांचा घटस्फोटही झाला. पण मुलांसाठी का होईना, या दोघांमधील मैत्री अद्याप अबाधित आहे. कालच हृतिक व सुजैन दोघेही आपल्या दोन्ही मुलांसोबत मुव्ही डेट एन्जॉय करताना दिसलेत. केवळ कालच नाही तर यापूर्वी अनेकदा हृतिक व सुजैन एकत्र दिसलेय. मग ती डिनर डेट असो, मुव्ही डेट असो किंवा बर्थ डे सेलिब्रेशन. हृतिक पुन्हा एकदा त्याच्या एक्स पत्नीसोबत लग्न करू इच्छितो, अशी खबर मध्यंतरी आली होती. पण हृतिक वा सुजैन यापैकी कुणीही यावर बोललं नाही. दोघांनीही या बातमीवर चुप्पी साधणेच पसंत केले. मात्र एकत्र क्वालिटी टाईम स्पेंड करणे करण्याचा त्यांचा ‘सिलसिला’ सुरु आहे. काही दिवसांपूर्वी हृतिकने एका मुलाखतीत सुजैनबद्दलचे त्याच्या मनातले प्रेम आटलेले नाही, हे अप्रत्यक्षपणे बोलून दाखवले होते. सुजैनपासून विभक्त झाल्यानंतर मी अद्याप लग्न वा कुणाशी डेट करण्याच्या मूडमध्ये नाहीय, असे त्याने सांगितले होते. सोबतच सुजैननेही ती आणि हृतिक अद्यापही चांगले मित्र असल्याचे म्हटले होते. हृतिक आणि सुजैन या दोघांची मुले त्यांना सांधणारा दुवा आहे. घटस्फोटानंतर दोन्ही मुले रिहान व रिधान आपल्या आईसोबत राहतात. पण हृतिकला या तिघांची कमतरता जरा अधिकच जाणवू लागली आहे. कदाचित याचमुळे हृतिकने या तिघांसाठी आपल्या घराजवळ एक फ्लॅट खरेदी केला आहे.हृतिक अपर जुहूत राहतो. याच भागात त्याने हा फ्लॅट खरेदी केला आहे. हृतिकच्या घरापासून हा फ्लॅट केवळ १५ मिनिटांच्या अंतरावर आहे. हृतिकचे आईवडिल त्याच्या घरापासून खूप जवळ राहतात. सुजैनचे आईवडिलही या भागात अगदी काही मिनिटांच्या अंतरावर असतात. केवळ सुजैन हृतिकपासून वेगळी झाल्यावर अंधेरीतील एका भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहत होती. आता ती सुद्धा हृतिकच्या घराजवळ शिफ्ट होईल, असे दिसतेय.