Join us

​प्रेग्नेंट असूनही ‘या’ अभिनेत्रींनी केले चित्रपटाचे शूटिंग !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 11:14 IST

-रवींद्र मोरे २०१२ मध्ये रिलीज झालेल्या 'हीरोइन' या चित्रपटासाठी ऐश्वर्या राय बच्चनला साइन करण्यात आले होते. पण याचकाळात निर्मात्यांना ...

-रवींद्र मोरे २०१२ मध्ये रिलीज झालेल्या 'हीरोइन' या चित्रपटासाठी ऐश्वर्या राय बच्चनला साइन करण्यात आले होते. पण याचकाळात निर्मात्यांना ऐश्वर्याच्या प्रेग्नेंसीविषयी समजले आणि त्यांनी तिच्याऐवजी करिना कपूरला चित्रपटासाठी साइन केले होते. ऐश्वर्याला ‘हीरोईन’ चित्रपट फक्त प्रेग्नेन्सीमुळे सोडावा लागला होता. मात्र बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्र्या आहेत, ज्या शूटिंगदरम्यान प्रेग्नेंट होत्या आणि त्यांनी शूटिंग पूर्ण केले. जाणून घेऊया त्यांच्याबाबत...* काजोल२०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वी आर फॅमिली’ या चित्रपटात काजोलने तीन मुलांच्या आईची व्यक्तिरेखा साकारली होती. मात्र या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान काजोल गर्भवती राहिली होती. प्रेग्नेंट असूनदेखील काजोलने केवळ चित्रपटाचे शूटिंगच पूर्ण केले नाही, तर ती प्रमोशनल इव्हेंटमध्येही सहभागी झाली. याकाळात काजोलने विश्रांती घ्यावी, असे मत अजय देवगणचे होते. पण डिलिव्हरीच्या काही महिन्यांपूर्वी काजोल तिच्या कामात बिझी होती.  * श्रीदेवी१९९७ मध्ये ‘जुदाई’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान श्रीदेवीला प्रेग्नेंसीविषयी कळाले होते. हा चित्रपट तिचे पती बोनी कपूर यांनीच प्रोड्युस केला होता. प्रेग्नेंसीची बातमी कळाल्यानंतरसुद्धा श्रीदेवीने चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले होते. नंतर श्रीदेवीने तिच्या मुलीचे नाव चित्रपटातील उर्मिला मातोंडकरच्या नावावरुन जान्हवी असे ठेवले.  * जया बच्चन१९७५ मध्ये रिलीज झालेल्या ‘शोले’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या काळात जया बच्चन तीन महिन्यांच्या गर्भवती होत्या. चित्रपटातील काही सीन्स बारकाइने बघितले अशता, त्यांचे बेबी बंप दिसून येते. त्यांनी व्हाइट साडीत बेबी बंप लपवले होते. त्यावेळी मुलगी श्वेता त्यांच्या पोटात होती. विशेष म्हणजे जेव्हा शोले हा चित्रपट रिलीज झाला आणि त्याचा प्रीमिअर झाला, त्यावेळी जया बच्चन दुसºयांदा गर्भवती राहिल्या होत्या. त्यावेळी अभिषेक बच्चन त्यांच्या पोटात होता.  * जूही चावला२००१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आमदनी अठन्नी खर्चा रुपैया’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या काळात जूही चावला गर्भवती राहिली होती. प्रेग्नेंसीविषयी कळाल्यानंतरसुद्धा जुहीने चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले होते. या चित्रपटाचे चित्रीकरण संपवून ती थिएटर प्लेसाठी अमेरिकालासुद्धा गेली होती. तर मुलगा अर्जुनच्या जन्माच्या वेळी जुही 'झंकार बीट्स' या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले होते.  * नंदिता दास२०११ साली आलेल्या 'आय एम' या चित्रपटाच्या शूटिंगच्या काळात नंदिता दास पाच महिन्यांची गरोदर होती. या चित्रपटात नंदिताने सिंगल मदरची व्यक्तिरेखा साकारली होती. प्रेग्नेंसी पीरियड असूनदेखील नंदिताने चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले होते. तिने आपल्या मुलाचे नाव विहान असे ठेवले आहे. * फराह खान२००७ मध्ये कोरिओग्राफर फराह खान ‘ओम शांती ओम’च्या शूटिंगच्या काळात प्रेग्नेंट होती. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर फराहने चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शन काम तासंतास स्टुडिओत बसून पूर्ण केले होते. शिवाय चित्रपटाचे प्रोमो एडिटिंगशिवाय मिटिंग्स, फिल्म प्रमोशन आणि पर्सनल इंटरव्ह्यूदेखील तिने दिले होते. 'ओम शांती ओम' हा चित्रपट फराह खानने दिग्दर्शित केला होता.