सेलिब्रिटी आपल्यापेक्षा काही तरी वेगळ्या असतात असं आपण मानतो..त्यांचं राहणं,खाणं,जगणं सारं काही वेगळं असतं.फावल्या वेळात हे सेलिब्रिटी काय करतात,एकटे असताना ते काय करतात आदी गोष्टी जाणून घेण्याची फॅन्सना इच्छा असते. अशा सेलिब्रिटीवेड्या फॅन्ससाठी आम्ही आणलीय एक खास बातमी.ही बातमी वाचून तुम्हीसुद्धा बुचकळ्यात पडल्याशिवाय राहणार नाही.बॉलीवुडचे स्टार्स आणि काही हॉलीवुडचे स्टार्स असे आहेत आहेत ज्यांना बेडरुममध्ये नेकेड झोपायला आवडतं. हे आम्ही नाही म्हणत, खुद्द या स्टार्सनी याचा खुलासा केलाय.चला तर मग जाणून घेऊ कोणत्या आहेत या सेलिब्रिटी.
जॉन अब्राहम
बॉलीवुडचा हॅण्डसम हंक अशी जॉन अब्राहमची ओळख. त्याच्यासारखी पिळदार बॉडी असावी असं स्वप्न त्याच्या अनेक फॅन्सचं... नुकत्याच रिलीज झालेल्या जॉनच्या ढिश्शूम या सिनेमालाही रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.. काही दिवसांपूर्वी जॉननं इन्स्टाग्रामवर टॉवेलमधील आपला फोटो शेअर केला होता.. त्याचा हा फोटो पाहून त्याच्या वर्षाच्या सुरुवातीला एका मुलाखतीमध्ये दिलेल्या विधानाची चटकन आठवण येते.. यांत जॉननं म्हटलं होतं की न्यूड झोपणं त्याला पसंत आहे.
जॅकलिन फर्नांडिस
बॉलीवुडची हॉट अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिनंही जॉनप्रमाणेच काहीसा खुलासा केला होता. व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी एका मुलाखतीमध्ये तिनं म्हटलं होतं की कमीत कमी कपडे परिधान करुन झोपणं तिला पसंत आहे.
पूनम पांडे
सोशल मीडियाची ड्रामा क्वीन आणि हॉट बॉम्ब अशी ओळख असलेली मॉडेल म्हणजे पूनम पांडे.. ट्विटरवर पूनम पांडे कायमच फॅन्सशी संवाद साधत असते.. बेडरुममध्ये न्यूड होऊन झोपणं पसंत करते असं ट्विट पूनमनं केलं होतं. नेकेड झोपण्यामागचा तर्कसुद्धा तिनं या ट्विटमध्ये आवर्जून नमूद केला होता.. नेकेड झोपलं पाहिजे कुणास ठाऊक तुमच्या स्वप्नात कधी कोण येईल असं तिनं म्हटलं होतं..
ज्या सेलिब्रिटींना बेडरुममध्ये नेकेड झोपायला आवडतं अशा सेलिब्रिटींमध्ये टीव्ही होस्ट आणि मॉडेल पद्मा लक्ष्मी हिचंही नाव घ्यायला हवं,, काही दिवसांपूर्वी एका मॅगझिनसाठी पद्मा लक्ष्मीनं स्ट्रीप्ड फोटोशूट केलं होतं.. या फोटोशूटनंतर नेकेड झोपायला आवडतं असा खुलासा तिनं केला होता.
मिरंडा केर
हॉलीवुडची प्रसिद्ध मॉडेल मिरंडा केर हिनं अनेक मॅगझिनसाठी नेकेड फोटोशूट केलंय. या फोटोशूटमुळं मिरंडा कायमच चर्चेत असते.. एका मुलाखतीमध्ये मिरंडानं आपल्याला न्यूड झोपायला आवडतं असं म्हटलं होतं.
रोजी हंटिंग्टन
ब्रिटीश सुपरमॉडेल रोजी हंटिंग्टन वाइटली हिलाही न्यूड झोपणं पसंत आहे.. तिचं स्वतःचं लॉन्जेरी रेंजसुद्धा आहे..याशिवाय आपला नियोजित पती जेसन यालाही न्यूड झोपलेलं पाहणं आवडतं असा खुलासा तिनं केला होता..