Join us  

Bollywood Heroine : ग्लॅमरस दिसण्यासाठी 'या' अभिनेत्रींनी घेतला प्लास्टिक सर्जरीचा आधार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2022 3:16 PM

1 / 8
कॉस्मेटिक सर्जरी म्हणलं ची सर्वात पहिलं नाव येतं ते अभिनेत्री 'शिल्पा शेट्टी'चं. बाजीगर सिनेमातील शिल्पा आणि त्यानंतरच्या आलेल्या सिनेमांमधील शिल्पा यात एक फरक दिसून येतो. कारण शिल्पाने बाजीगर नंतर नाकाची सर्जरी केल्याचे दिसून आले आहे.
2 / 8
देसी गर्ल प्रियांका चोप्रानेही कॉस्मेटिक सर्जरीचा आधार घेतला आहे. यापुर्वीचे प्रियांकाचे फोटो बघितले तर ओळखुही येणार नाही असेच आहेत. प्रियांकाने ओठ आणि नाकाची सर्जरी केली आहे.
3 / 8
अभिनेत्री अनुष्का शर्माने रब ने बना दी जोडी मधुन बॉलिवुडमध्ये पदार्पण केले. यानंतर काही वर्षांनी जेव्हा ती पीके या सिनेमात दिसली तेव्हा चाहत्यांना तिच्या चेहऱ्यात काहीसा बदल दिसला. मग समजले की अनुष्काने तर ओठांची सर्जरी केली आहे.
4 / 8
बॉलिवुडची ब्युटी क्वीन कॅटरिना कैफनेही प्लास्टिक सर्जरी केली आहे. तिचे आधीचे फोटो आणि सध्याचे फोटो यात बराच फरक दिसून येतो. तिनेही ओठांची सर्जरी केल्याचे स्पष्ट दिसून येते.
5 / 8
शुद्ध देसी रोमान्स फेम अभिनेत्री वाणी कपुर आत्तापर्यंत कमी सिनेमांमध्ये दिसली आहे. मात्र तिचा बदललेला लुक नेहमीच चाहत्यांना संभ्रमात टाकणारा आहे. तिने ओठ, चेहऱ्यावर इतरही बदल केले आहेत.
6 / 8
कमल हसन यांची मुलगी श्रुती हसन हिनेही अनेकदा चेहऱ्यावर सर्जरी केली आहे. यावर तिला ट्रोलही करण्यात आले होते. मी माझ्या शरीरासोबत काय करते हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे असे तिने ट्रोलर्सला सुनावले होते.
7 / 8
ऐश्वर्या रॉय बच्चन तर विश्वसुंदरी आहे मात्र तरी तिला बोटॉक्स आणि इतर सर्जरी करण्याची गरज काय असा प्रश्न चाहत्यांना पडला जेव्हा तिने ओठ, नाक, फेशियल फिलर्स सारखे बदल केले होते.
8 / 8
प्लास्टिक सर्जरीमुळे सर्वात जास्त ट्रोल झालेली अभिनेत्री म्हणजे आएशा टाकिया. सर्जरीनंतर आएशाचा भयानक चेहरा पाहून अनेक जणांनी तिच्यावर टीका केली.
टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनशिल्पा शेट्टीश्रुती हसनप्रियंका चोप्रा