Join us  

Rani Mukherjee House : पती आदित्य आणि लेक आदिरासोबत आलिशान घरात राहते राणी मुखर्जी;पाहा घराचे Inside photos

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 5:41 PM

1 / 10
Rani Mukherjee House Pics: राणी मुखर्जी लवकरच 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' या चित्रपटातून कमबॅक करणार आहे. आज आम्ही तुम्हाला तिच्या आलिशान घराची झलक दाखवणार आहोत.
2 / 10
राणी मुखर्जी ही बॉलिवूडमधील अशा अभिनेत्रींपैकी जिने कारकिर्दीच्या दुसर्‍या इनिंगमध्ये अभिनयाच्या जोरावर अधिराज्य गाजवले आहे. 1996 मध्ये बॉलिवूड करिअरची सुरुवात करणाऱ्या राणीने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
3 / 10
राणीने २०१४मध्ये आदित्य चोप्रासोबत लग्न केलं आणि मीडियाच्या लाइमलाइटपासून स्वत:ला दूर केलं. राणी आदित्य आणि मुलगी आदिरासोबत आलिशान घरात राहते.
4 / 10
या घराचा ड्रॉइंग रूम एरिया अप्रतिम सुंदर आहे. आरामदायी काऊच फारच खास आहेत. (Source: amarujala)
5 / 10
आऊटडोअर फिटनेस स्टेशनसोबत मुलांना खेळण्यासाठी एक गेमिंग एरियाही आहे. (Source: cdn)
6 / 10
राणीच्या घरात एक लायब्ररी सुद्धा आहे. यात अनेक पुस्तकांचं कलेक्शन आहे. शिवाय वाचनासाठी हवी ती शांतताही आहे. (Source: mumbaipropertyexchange)
7 / 10
या घरात एक लक्झरी मिनी थिएटरही आहे. येथे राणी तिच्या मित्रांसोबत चित्रपटांना आनंद घेऊ शकते. (Source: bollywoodshaadis)
8 / 10
या अलिशान घरात एक प्रशस्त टेरेसही आहे. टेरेसही खास पद्धतीनं सजवण्यात आलं आहे आणि पार्टीसाठी एकदम रेडी आहे. (Source: desimartini)
9 / 10
टेरेसचं इंटीरिअर, येथील फर्निचर पाहण्यासारखं आहे. पाहून तुम्हीही या टेरेसच्या प्रेमात पडाल.
10 / 10
घरात एक स्वीमिंग पूल एरियाही आहे. चहूबाजूंनी झाडांनी वेढलेल्या या स्वीमिंग पूलची बातचं न्यारी.
टॅग्स :राणी मुखर्जीसेलिब्रिटीआदित्य चोप्रा