Join us  

IN PICS : मुग्धा गोडसेने कधीकाळी पेट्रोल पंपावर केले काम, या अभिनेत्यासोबत आहे नात्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 5:32 PM

1 / 10
फॅशन या चित्रपटाद्वारे मुग्धा गोडसेने बॉलिवूडमधील तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. आज मुग्धाचा वाढदिवस.
2 / 10
मुग्धा अतिशय सामान्य घरातून आली आहे. तिचे शिक्षण पुण्यात झाले असून तिने कॉमर्स मधून तिचे शिक्षण घेतले आहे.
3 / 10
मुग्धाने एक मॉडेल म्हणून तिच्या करिअरला सुरुवात केली. ती बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी अतिशय प्रसिद्ध मॉडेल होती.
4 / 10
तिने ग्लॅडरस मेगा मॉडेल हंट जिंकले होते. याच स्पधेर्मुळे ती प्रकाशझोतात आली.
5 / 10
फेमिना मिस इंडिया या स्पर्धेत सेमी-फायनलपर्यंत देखील मजल मारली होती. मुग्धाने मॉडलिंगमध्ये करिअर करण्याआधी ती एका वेगळ्याच क्षेत्रात होती.
6 / 10
खूपच कमी जणांना माहीत आहे की, मुग्धाने या क्षेत्रात येण्यापूर्वी पेट्रोल पंपावर देखील काम केले आहे. तिथे तिला दिवसाला केवळ 100 रुपये मिळत असे. पण तरीही तिने हे काम अनेक दिवस आनंदाने केले.
7 / 10
मुग्धा मुळची पुण्याची असली तरी मॉडलिंग या क्षेत्रात करियर करण्यासाठी ती मुंबईत शिफ्ट झाली.
8 / 10
फॅशन या तिच्या पहिल्याच चित्रपटातील तिच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले. त्यानंत ती आॅल द बेस्ट, जेल, हिरोईन, यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकली.
9 / 10
मुग्धा गोडसे आणि राहुल देव गेल्या अनेक महिन्यांपासून नात्यात आहेत. राहुल देवचे पहिले लग्न झाले असून त्याला एक मुलगा देखील आहे.
10 / 10
राहुलचे पहिले लग्न रिनासोबत झाले होते. रिनाचे 2009मध्ये कर्करोगाने निधन झाले. मुग्धा आणि राहुल पॉवर कपल या कार्यक्रमात देखील झळकले होते.
टॅग्स :राहुल देव