Join us  

birthday special : अमिताभ यांच्यासाठी मैत्रिणींशी भांडायच्या जया बच्चन!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2017 6:55 AM

अभिनेत्री जया बच्चन यांचा आज (९ एप्रिल) हा वाढदिवस. ९ एप्रिल १९४८ रोजी मध्यप्रदेशातील जबलपूर येथे जया यांचा जन्म ...

अभिनेत्री जया बच्चन यांचा आज (९ एप्रिल) हा वाढदिवस. ९ एप्रिल १९४८ रोजी मध्यप्रदेशातील जबलपूर येथे जया यांचा जन्म झाला. अनेक यादगार चित्रपटांत काम करणाºया जया बच्चन आज भलेही चित्रपटांपासून दूर आहेत. पण एकेकाळी, त्यांचाच बोलबाला होता. समर्पणवृत्तीने काम करणारी अभिनेत्री, अशी त्यांची ख्याती होती. हेच कारण होते की, गर्भवती असतानादेखील त्यांनी ‘शोले’चे चित्रीकरण पूर्ण केले होते. त्यावेळी अभिषेक त्यांच्या पोटात होता.जया बच्चन यांनी उण्यापुºया पंधरा वर्षांच्या वयात अभिनय सुरु केला. सत्यजीत रे यांच्या ‘महानगर’ या बंगाली चित्रपटात जया सर्वप्रथम झळकल्या. यात त्या सहाय्यक भूमिकेत होत्या.सत्यजीत रे यांच्या प्रभावामुळे जया यांनी फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला आणि गोल्ड मेडलसह येथील अभ्यासक्रम पूर्ण केला.सुप्रसिद्ध अभिनेते डॅनी यांना हे नाव जया बच्चन यांनीच दिलेयं. फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये डॅनी जयांना ज्युनिअर होते. डॅनीचे खरे नाव शेरिंग फँटसो होते.अमिताभ बच्चन यांच्यासोबत जया सर्वप्रथम ‘बंसी बिरजू’ या चित्रपटात दिसल्या. यानंतर ‘जंजीर’,‘अभिमान’,‘चुपके चुपके’,‘मिली’,‘शोले’,‘सिलसिला’ अशा अनेक हिट चित्रपटांत ही जोडी दिसली.जया बच्चन पुण्यात शिकत असताना याचठिकाणी अमिताभ बच्चन आपल्या ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटासाठी आले होते. जया बच्चन यांनी अमिताभ यांना पाहिले आणि त्यांच्या प्रेमात पडल्या. जया बच्चनच्या मैत्रिणी अमिताभ यांना ‘लंबू लंबू’ म्हणून चिडवायच्या. यावर जया त्यांच्यासोबत जाम भांडायच्या. हरिवंश राय बच्चन यांचा एक संस्कारी मुलगा अशी अमिताभ यांची प्रतिमा त्यांच्या मनात होती.जया व अमिताभ यांची भेट घालून दिली होती ती ऋषिकेश मुखर्जी यांनी. ‘गुड्डी’च्या सेटवर अमिताभ व जया यांची भेट झाली होती.  यानंतर १९७३ मध्ये अमिताभ व जया ‘जंजीर’मध्ये एकत्र दिसले. याचदरम्यान या दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. खरे तर ‘जंजीर’ पूर्ण झाल्यानंतर अमिताभ व जया दोघेही विदेशात सुट्टी एन्जॉय करण्याच्या मूडमध्ये होते. पण अमिताभ यांचे पिता हरिवंश राय यांनी यास नकार दिला. लग्न करा आणि मग हवे तिथे जा, असे त्यांनी बचावले. मग ३ जून १९७३ रोजी दोघेही लग्नगाठीत अडकले.अमिताभ बच्चन यांच्या ‘शहंशाह’ चित्रपटाची कथा जया बच्चन यांनी लिहिली होती.लीड अ‍ॅक्ट्रेस रूपात जया बच्चन यांचा अखेरचा सिनेमा ‘सिलसिला’ हा होता. यानंतर सुमारे १८ वर्षांच्या ब्रेकनंतर जया बच्चन गोविंद निहलानी यांच्या ‘हजार चौरासी की मां’ याचित्रपटात दिसल्या. यानंतर ‘कभी खुशी कभी गम’, ‘कल हो ना हो’ आणि ‘फिजा’ अशा चित्रपटात त्या झळकल्या.