Join us

​‘बेस्ट अ‍ॅक्टर’नाहीत पण तरिही ब्लॉकबस्टर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2017 15:11 IST

बॉलिवूडमध्ये सलमान खानपासून तर अक्षय कुमारपर्यंत अनेक जबरदस्त स्टार्स आहेत. हे स्टार्स चित्रपटात असणे म्हणजे चित्रपट ब्लॉकबस्टर होणार, हे ...

बॉलिवूडमध्ये सलमान खानपासून तर अक्षय कुमारपर्यंत अनेक जबरदस्त स्टार्स आहेत. हे स्टार्स चित्रपटात असणे म्हणजे चित्रपट ब्लॉकबस्टर होणार, हे ठरलेले.   यापैकी स्टार्सपैकी अनेकांनी आजपर्यंत बरेच ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. पण ब्लॉकबस्टर चित्रपट देवूनही बेस्ट अ‍ॅक्टर व बेस्ट अ‍ॅक्ट्रेसचा अवार्ड घेणे यांना जमलेले नाही. होय, आम्ही बोलतोय ते फिल्मफेअर अवार्डबद्दल. बॉक्सआॅफिसवर कोट्यवधीची कमाई करून देणारे हे स्टार्स फिल्मफेअर बेस्ट अ‍ॅक्टर वा बेस्ट अ‍ॅक्ट्रेसचा अवार्ड पटकावण्यात अपयशी ठरलेत. या यादीतील काही स्टार्सवर एक नजर...धर्मेन्द्र​ज्येष्ठ अभिनेते धर्मेन्द्र यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक क्लासिक सिनेमे दिलेत. पण धर्मेन्द्र यांना कधीच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाना नाही. ३७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर १९९७ मध्ये त्यांना लाईफटाईम अचिव्हमेंट अवार्ड मिळाला. पण सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने मात्र त्यांना कायम हुलकावणी दिली.गोविंदाअनेक ब्लॉकबस्टर सिनेमे देणारा अभिनेता गोविंदा याला फिल्मफेअर बेस्ट अ‍ॅक्टरच्या पुरस्कारासाठी सुमारे १२ वेळा नॉमिनेशन मिळाले आहे. पण प्रत्येकवेळी या पुरस्काराने गोविंदाला हुलकावणी दिली.अक्षय कुमारअक्षय कुमारचे काम बोलते. आपल्यातील प्रतिभेच्या जोरावर अक्षयने एकापेक्षा एक हिट दिले आहेत. आता तर त्याला मनी मेकिंग मशीन म्हटले जातेय. अलीकडे त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पण फिल्मफेअर पुरस््कारावर मात्र अद्याप त्याला आपले नाव कोरता आलेले नाही.जॉन अब्राहमबाईकरपासून तर गे पर्यंतच्या अनेक भूमिका साकारणा-या जॉन अब्राहमने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केलेय. पण आजपर्यंत त्याला एकही फिल्मफेअर पुरस्कार मिळालेला नाही.सोनम कपूर‘नीरजा’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणा-या सोनम कपूर हिलाही फिल्मफेअर पुरस्काराने कायम हुलकावणी दिली आहे.कॅटरिना कैफकमी वेळात आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये नाव कमावणारी अभिनेत्री कॅटरिना कैफ अद्यापही फिल्मफेअर बेस्ट अ‍ॅक्ट्रेस अवार्डपासून दूर आहे.सलमान खान बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान बॉलिवूडचा सर्वाधिक यशस्वी अभिनेता मानला जातो. सध्याचा ब्लॉकबास्टर अभिनेता म्हणून तो ओळखला जातो. पण अद्याप एकदाही सलमानला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला नाही, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.अजय देवगणअजय देवगण एक गुणी अभिनेता. आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये अजयने दोन राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. मात्र अद्याप त्याला फिल्मफेअर पुरस्कार जिंकता आलेला नाही.तब्बूबॉलिवूडमध्ये तब्बूचे नाव आदराने घेतले जाते. आपल्या करिअरमध्ये तब्बूने एकापेक्षा एक सरस भूमिका साकारल्या. पण आजपर्यंत तब्बूला फिल्मफेअर पुरस्कारावर स्वत:चे नाव कोरता आले नाही.