Join us

अमृता अरोराच्या बर्थ डे पार्टीत कापला गेला ‘ADULT’ केक! संतापले लोक!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 15:47 IST

आज ३१ जानेवारी म्हणजे, अभिनेत्री अमृता अरोरा हिचा बर्थ डे. होय, मलायका अरोराची बहीण तीच ती अमृता अरोरा. काल ...

आज ३१ जानेवारी म्हणजे, अभिनेत्री अमृता अरोरा हिचा बर्थ डे. होय, मलायका अरोराची बहीण तीच ती अमृता अरोरा. काल १२ च्या ठोक्याला गोव्यात अमृताचा वाढदिवस साजरा झाला. अमृताची बेस्ट फ्रेन्ड करिना कपूर हिने अमृतासाठी गोव्यात शानदार पार्टी आयोजित केली होती. मग काय, पार्टी आॅर्गनायजर म्हटल्यावर थोडा तर खट्याळपणा बनतोच. करिनाने तेच केले. या पार्टीसाठी करिना, तिचा पती सैफ अली खान, मलायक अरोरा, करिश्मा कपूर असे सगळे एका चार्टर्ड प्लेनने गोव्यात पोहोचले. गोव्यात पोहोचल्यावर रात्री १२ वाजता पार्टी सुरु झाली.पार्टीची थीम होती, ‘ट्रायबल’. मग काय, करिना, मलायका, करिश्मा असे सगळेच या थीमनुसार पार्टीत पोहोचले. पार्टी सुरु झाली. केक कटिंगची वेळ आली आणि  केक आणला गेला. पण हा केक बघून सगळेच खो-खो हसत सुटले. स्वत: अमृतालाही हसू आवरेना. सगळे अगदी पोट धरून धरून हसले. आता या केकमध्ये असे काय होते? तर करिनाचा खट्याळपणा. आता आम्ही कुठल्या खट्याळपणाबद्दल बोलतोय, ते केक पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच.आधी तर हा केक कापताना अमृताही जरासी कचरली. पण नंतर थोडे डिवचल्यावर करिना व तिच्या गँगला हव्या त्या अंदाजातच तिने केक कापला. पार्टीत करिना व तिच्या गँगने कुठलीच कसर सोडली नाही. ड्रेसपासून ती ज्वेलरीपर्यंत सगळे अ‍ॅन्टिक आणि थीमला साजेसे होते. या पार्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. हे फोटो तुम्हीही बघा आणि काय वाटते, ते आम्हाला नक्की कळवा.