Join us  

वयाच्या ४९ व्या वर्षीही स्वत:ला अशी फिट ठेवते सलमान खानची ‘ही’ अभिनेत्री, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2018 3:33 PM

अभिनेत्री भाग्यश्रीचे वय ४९ वर्षे इतके आहे. मात्र या वयातही ती स्वत:ला कमालीची फिट ठेवते. भाग्यश्री स्वत:ला फिट ठेवण्यासाठी नियमितपणे एक्सरसाइज करते.

अभिनेत्री भाग्यश्रीचे वय ४९ वर्षे इतके आहे. मात्र या वयातही ती स्वत:ला कमालीची फिट ठेवते. भाग्यश्री स्वत:ला फिट ठेवण्यासाठी नियमितपणे एक्सरसाइज करते. भाग्यश्रीने स्वत:चे काही फोटोज् इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले असून, त्यामध्ये ती खूपच हार्ड वर्कआउट करताना दिसत आहे.भाग्यश्रीने तिच्या इन्स्टा अकाउंटवर बरेचसे फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये तिची मेहनत स्पष्टपणे दिसून येते.भाग्यश्रीच्या चाहत्यांनीही तिच्या या हार्ड वर्कआउटचे कौतुक केले. कॉमेण्ट बॉक्समध्ये तिच्या या फोटोंना प्रचंड प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.भाग्यश्री तिच्या फिटनेसबद्दल खूपच अलर्ट आहे. ती नियमितपणे जीम जाणे पसंत करते. त्याचबरोबर हार्ड वर्कआउटही करते.भाग्यश्रीने १९८९ मध्ये आलेल्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून सुपरस्टार सलमान खानसोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.या चित्रपटात तिने सलमानच्या अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर हिट ठरला.